-
Best Kept Secret Part-3 (बेस्ट केप्ट सीक्रेट खंड-३
बॅरिंग्टन हे लंडनमधील एक सधन आणि नामवंत घराणं. ह्यूगो बॅरिंग्टन हा त्या घराण्याचा वंशज. गाइल्स आणि एमा ही त्याची दोन अपत्यं. हॅरी क्लिप्टन हा ह्यूगोचा अनौरस मुलगा. ह्यूगोची झालेली हत्या, हॅरी क्लिप्टन आणि एमा बॅरिंग्टन यांच्या लग्नाला चर्चने केलेली मनाई, ह्यूगोच्या हत्येनंतर बॅरिंग्टन घराण्याच्या वारसाबाबत न्यायालयात उभा राहिलेला वाद, या प्रकरणात गाइल्सच्या बाजूने लागलेला निकाल, त्यानंतर हॅरी व एमाचा झालेला विवाह, त्यानंतर त्यांच्या मुलाचा सॅबेस्टियनचा जन्म, ह्यूगोच्या एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलगी जेसिका हिला एमा आणि हॅरीने दत्तक घेणे, यथावकाश सॅबेस्टियनचा तारुण्यात प्रवेश, गाइल्सचा निवडणुकीत विजय, एमा आणि गाइल्सच्या आईचा एलिझाबेथचा मृत्यू, मृत्यूसमयी तिने हॅरीच्या हातात दिलेला लिफाफा, खट्याळ पण अतिशय हुशार असणारा सेबॅस्टियन एका डॉनच्या जाळ्यात सापडणं, डॉनचा सज्जन मुलगा ब्रूनोशी सेबॅस्टियनची चांगली मैत्री होणं, सेबॅस्टियनकडून आपल्या बनावट नोटा रोदिनने बनवलेल्या एका पुतळ्यातून इंग्लंडमध्ये आणण्याचा बेत डॉनने रचणं, सेबॅस्टियनला याची कल्पनाच नसणं, या बेताचा सुगावा पोलिसांसहित हॅरी, एमा आणि गाइल्सलाही लागणं, त्याच वेळी सेबॅस्टियनाला केंब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्याची बातमीही सर्वांना समजणं अशा नाट्यपूर्ण घटनांसाठी आणि डॉन या बनावट नोटा इंग्लंडमध्ये आणण्यात यशस्वी होतो का, डॉनच्या तावडीतून सुटून सेबॅस्टियन आपल्या आई-वडिलांचे केंब्रिज विद्यापीठात त्याने शिक्षण घ्यावे हे स्वप्न पूर्ण करू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’ हे पुस्तक वाचलं पाहिजे.
-
Garudjanmachi Katha (गरुडजन्माची कथा)
ब्रह्मदेवाला कोणे एके काळी पाच मस्तकं होती हे तुम्हास माहीत आहे का? भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? देव इतरांची फसवणूक करतात का? आपणा सर्वांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं चराचरात अस्तित्व असून, हे जग आणि आपली मानवजात अस्तित्वात आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच. संपूर्ण भारतात सगळीकडे या तीनही देवतांची उपासना केली जाते; परंतु या देवतांबद्दलच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य कथा अजूनही फारशा कुणाला माहीत नसतात. अनेक पुरस्कारविजेत्या लेखिका सुधा मूर्ती या वाचकांना हाताला धरून या अनोख्या, अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. प्राचीन युगातील या तीन अत्यंत शक्तिशाली देवतांविषयीच्या अद्भुतरम्य कथा त्या वाचकांसमोर उलगडतात. कथा संग्रहातील प्रत्येक कथा तुम्हा सर्वांना एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जाईल. त्या कथा ज्या कालखंडात घडतात, तेव्हाच्या व्यक्ती मनोवेगाने दूरदूरच्या प्रदेशात भ्रमंती करू शकतात, यातले प्राणी उडू शकतात आणि यात पुनर्जन्म तर नेहमीच होत असतात.
-
Be Careful What You Wish For Part-4 (बी केअरफुल व्
‘बी केअरफुल व्हॉट यु विश फॉर’ हा ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’चा पुढचा भाग आहे. या कादंबरीची सुरुवात होते, ती एमाला सॅबेस्टियनचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजते, अशा थरारक आणि भावपूर्ण प्रसंगाने. या कादंबरीचा प्रवास नंतरही रोमांचकतेने आणि भावात्मकतेने सुरू राहतो. सॅबेस्टियन या अपघातातून वाचला आहे आणि आपला मुलगा ब्रुनो अपघातात मरण पावला आहे., हे समजल्यावर डॉन मार्टिनेझ संतापाने वेडापिसा होतो आणि मग बॅरिंग्टन कुटुंबाच्या तो हात धुऊन मागे लागतो. बॅरिंग्टन कंपनीच्या बकिंगहॅम जहाजाच्या बांधणीचं काम चालू असताना तिथल्या डायरेक्टरला हटवण्याचा प्रयत्न करणे, शेअर बाजारात बॅरिंग्टन यांची कंपनी भुईसपाट होण्यासाठी प्लॅन करणे, जेसिकाचा खून करणे आणि बकिंगहॅम जहाजावर बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखणे इ. थरारक घटनांतून बॅरिंग्टन कुटुंब आणि डॉन मार्टिनेझ यांच्यातील तीव्र संघर्ष रंगविणारी ही रहस्यमय, उत्कंठावर्धक कादंबरी वाचलीच पाहिजे.
-
Soniya Gandhi Ek Annanyasadharan Jeevanpravas ( सो
भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर सोनियांचा उदय कसा झाला आणि त्यांनी लक्षावधी भारतीयांची हृदये कशी जिंकली, याची ही मनोवेधक कहाणी. सोनियांची हि कहाणी गेल्या चार दशकांमधील कोणत्याही जागतिक पातळीवरील नेत्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या राजकीय महत्वकांक्षेपेक्षा प्राप्त परिस्थिती आणि आयुष्यात घडलेली दारूण शोकांतिका या दोन गोष्टीमुळे राजकारणाच्या मार्गावर सोनियांची वाटचाल सुरु झाली. एक परंपराप्रिय, मध्यमवर्गीय, इटालियन कुटुंबात वाढलेल्या सोनिया, केंब्रिजला येऊन इग्रंजी शिकता- शिकता राजीव गांधीच्या प्रेमात पडल्या. हे राजीव गांधी म्हणजे जवाहरलाल यांचे नातू इंदीरा गांधी यांचे सुपुत्र होते. आपल्या सासूबाई - इंदीराजी आणि पती राजीव गांधी यांच्या अमानुष हत्येनंतर सोनियांचे व्यक्ती महत्व बदलून गेले. त्या खंबीर, कणखर व ठाम विचारांनच्या बनल्या, पण त्या पूर्वीपासून अत्यंत मितभाषी होत्या आणि तशाच राहिल्या. आत्ता त्या आघाडी सरकारच्या अध्यक्ष बनल्या आणि सर्वांत मोठया लोकशाही राष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करू लागल्या आहेत. सरकारमधील वरिष्ट पदाधिकारी ( माजी आणि आत्ताचे), सोनियाचे पक्षातील सहकारी, राजकीय विरोधक आणि त्यांच्या परिवारचे निकटवर्तीय यांच्या मुलाखती आणि संशोधनामधून राणी सिंग यांनी सोनियांवर एक नवीन प्रकाशझोत टाकला आहे. लेखिकेने समर्थ lekhanimadhun धीरोदत्त आणि आकर्षक व्यक्तीमहत्व असणा-या सोनियांच्या आयुष्याचा प्रवास वाचकांसमोर मांडला आहे. सोनियांचे संपूर्ण जीवन आणि त्याचा वारसा याचे भारताच्या दृष्टीने काय महत्व आहे, याचेही विश्लेषण केले आहे .
-
Ajichya potditlya goshti (आजीच्या पोतडीतल्या गोष्ट
सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत! उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते. ही नातवंडं आपल्या आजीकडे खेड्यात सुट्टी घालवायला आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं, तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की, समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं, तर कधी एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात. आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात. चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या!
-
Ayushyache dhade giravtana (आयुष्याचे धडे गिरवताना
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात, अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात, काही घटना वाईट. काही सुखकारक असतात, तर काही दु:खदायक. काही व्यक्ती चमत्कारिक असतात, तर काही अनुभव मन थक्क करणारे.... हे अनुभव, या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपले आयुष्य विविध अंगांनी संपन्न करतात; परिपक्व बनवतात. या संग्रहात सुधा मूर्ती यांनी या अनुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथारूप दिले आहे. या कथा जशा सुधा मूर्ती यांच्या आहेत, तशा त्या तुमच्या-आमच्या आहेत; विलक्षण चमत्कृतींनी भरलेल्या, गुंतागुंतीच्या जीवनाविषयीच्या आहेत. सहजसोप्या कथनशैलीतून उलगडत जाणाऱ्या या कथा ‘आयुष्याचे धडे’ देतात; अंतर्मुख करतात.
-
Lajja (लज्जा)
लज्जा’ ही तसलिमा नासरिन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूंचा केलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणार्या हिंदूंची केलेली कोंडी असा या कादंबरीचा विषय आहे. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडले आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेमाने लढलेले सुधामयबाबू, त्यांचा मुलगा सुरंजन, त्यांची कन्या माया (निलोचना), त्यांची पत्नी किरणमयी अशा चारजणांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची ही कथा आहे. धर्म आणि देश या गोष्टींमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. मूलतत्त्ववादी आपल्या कुटुंबाचा छळ करतात तरीही देशप्रेमाने, आदर्शवादाने भारावलेले हे कुटुंब जातीय सलोखा व्हावा म्हणून प्रयत्न करते. पण परिस्थिती विकोपाला गेली, हिंदूंची मानखंडना पाहिली आणि अखेर बांगलादेश सोडून भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रकार लज्जास्पद होता.
-
Indira ( इंदिरा )
३१ ऑक्टोबर, १९८४... सकाळची वेळ. त्या आपल्या बगिच्यातून चालत निघाल्या होत्या. चेहर्यावर स्मितहास्य. दोन्ही हात जोडून नमस्कार करत.इंदिरा नेहरू गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली.त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केलं, अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त झाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच एका महानाट्याचा, एका आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिराजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना 'क्रांतीचे अपत्य' म्हणून संबोधले. शरीर, मनाने कणखर अशा इंदिराजींना स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, हे मुळी विधिलिखितच होतं. ही भूमिका अंगिकारताना सुरुवातीला त्या काहीशा कचरल्याही होत्या. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंदिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली व त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जगातील सर्वात सामर्थ्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या, परंतु येथील समाजात धर्मांधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राचे नेतृत्व ज्या स्त्रीने समर्थपणे संभाळले, विसाव्या शतकाच्या इतिहासात ज्या स्त्रीने आपली नाममुद्रा उमटवली व ज्या स्त्रीला 'वूमन ऑफ द मिलेनियम' म्हणून गौरवण्यात आले अशा एका स्त्रीच्या जीवनाचा मागोवा कॅथरीन फ्रँक यांनी येथे घेतला आहे.
-
Goshti Mansancha
तुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल ? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर... ? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर... ? सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजक कथांमधून या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती... प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणार्या लेखिका ! या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे... एक नवा व्यवसाय सुरू करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे... "मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृद्ध कर", असं वचन आपल्या नातीकडून घेणार्या, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे. या गोष्टी हसवणार्या, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपली स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते.