-
Chumban (चुंबन)
तळागाळातल्या असंख्य स्त्रिया आणि त्यांचे संघर्ष... कधी स्थलांतराच्या वाटेत भरडणाऱ्या, तर कधी पुरुषी वर्चस्वाखाली भरडणाऱ्या या स्त्रिया. त्यांच्या दुःखांना शब्दबद्ध करण्याचं काम तसलिमा नासरिन करतात. या नायिका जितक्या परिस्थितीने हतबल आहेत, तितक्याच खमक्याही आहेत. जगण्याची अगम्य जिद्द त्यांच्यात दिसते. त्या अघोरी धर्मवादाविरोधात उभ्या राहतात, अनिष्ट रूढी-परंपरांविरोधात उभ्या राहतात. प्रसंगी प्राणांची बाजी लावून स्वतःची मूल्ये जोपासतात. त्यामुळेच यातल्या प्रत्येक कथेत एक थक्क करणारी नायिका भेटते.
-
Besharam (बेशरम)
तसलिमा नासरिन यांची ही कादंबरी स्थलांतरितांच्या जीवनाची चित्तरकथा आहेण् आपली जन्मभूमि सोडून परक्या मुलखातए जगभरच्या कानाकोपऱ्यातए वेगवेगळ्या वातावरणात स्वतःला रूजवू पाहणाऱ्यांची ही गोष्ट आहेण् अर्थात तसलिमा यांनी स्वतः हे आयुष्य जवळून अनुभवलेले आहेण् म्हणूनच स्वतः तसलिमा यांचं जगणंही यात प्रतिबिंबित होत राहतंण् त्यांच्या ष्लज्जाष् कादंबरीमुळे त्यांना कट्टरपंथी लोकांनी देश सोडायला लावलाण् लज्जामध्ये अनुभवाला येणाऱ्या प्रसंगांचीच पुढील आवृत्ती या कादंबरीत पाहायला मिळतेण् तसलिमा यांनी मोठा काळ देशाबाहेर व्यतित केला आहेण् आपली मूळे उखडली जाण्याची ही वेदना या कादंबरीत प्रकर्षाने येतेण् कादंबरीची सुरुवातच एका भेटीने होतेण् लज्जा कादंबरीतील पात्र असणारा सुरंजन लेखिकेला अचानक भेटायला येतोण् हा तोच सुरंजन असतोए जो लज्जा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेण् लेखिका या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे की सुरंजन आणि त्याचे कुटुंब बांगलादेशातील 1993मधील सांप्रदायिक दंगलीवेळी स्वतःचा बचाव करत भारतात येण्यात यशस्वी झाले होतेण् या भेटीत लेखिकेला कळतं की सुरंजनचे वडील सुधामय यांचे निधन झाले आहेए तर त्याची आई आणि बहीण जिवंत आहेतण् या भेटीत सुरंजनच्या स्थलांतराचे गोष्ट समोर येतेण् या दोघांच्या संवादातून एकेक धागा उलगडत जातोण् याच धर्तीवर लेखिकेला एकेक पात्र भेटत जातेण् आणि त्यांच्या कथा समोर येत जातातण् हे पुस्तक कट्टरपंथीयांची बेशरमी वृत्ती अधोरेखित करत त्या विरोधात आवाज उठवण्याच्या संभावनांची चाचपणी करतंण् पण हे पुस्तक राजकीय नाहीए तर सामाजिक स्तरावरील स्थितीबाबत अधिक निवेदन करतंण् लेखिका अर्थात तसलिमा यांना सुरंजनए किरणमयीए माया आणि जुलेखा ही चार पात्र भेटतातण् आणि या पात्रांसोबतचा संवाद कादंबरी प्रवाहित करतोण्
-
Sokol Griho Haralo Jar (शोकोल ग्रिह हारालो जार)
अनंत अडचणींचा सामना करत, खुनाच्या धमक्या येऊनसुद्धा अंतरातल्या आवाजाला सतत प्रतिसाद देत, तळमळीने, निर्भयपणाने लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे तसलिमा नासरिन. ‘शोकोल ग्रिह हारालो जार’ हे पुस्तक उपरोक्त विधानाला पुष्टी देणारे असेच आहे. या पुस्तकात तसलिमाने विविध विषयांचा परामर्श घेतला आहे. अगदी अमेरिकेच्या निवडणुकीपासून ते फिडेल कॅस्ट्रोच्या क्यूबापासून अंधश्रद्धांपर्यंत अनेक विषयांवर तिने पोटतिडकीने, निर्भयतेने रोखठोक शब्दांत स्वतःची मते मांडली आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यातील अडचणी, अन्याय, एकाहत्तर सालच्या कटू आठवणी यांबद्दलही लिहिले आहे. सर्व प्रकारची विषमता दूर होऊन सर्व जग म्हणजे एक एकसंध, सुसंस्कृत, मानवतावादी समाज घडावा, ही तळमळ हा तिच्या लिखाणाचा पाया आहे.
-
Bhabnagulo (भाबनगुलो)
Taslima nasrin is known for her writing on women's oppression and criticism of religion, despite forced exile and multiple fatwas calling for her death. & in this essays she once again rightly pointed out the various social issues. ‘भाबनागुलो’ अर्थात चिंताच चिंता..समाजातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांचे संवेदनशील मनात उमटणारे पडसाद या पुस्तकात प्रतिबिंबित होतात. कवीमनाच्या तसलिमा नासरिन नानाविध विषयांवर मुक्त चिंतन करतात. मुल्ला-मौलवीच्या फतव्यांमध्ये घुसमटणारं स्त्रीमन...मूलतत्त्ववादाच्या भोवऱ्यात अडकलेला राष्ट्रवाद...स्थलांतरातली अपरिहार्यता...अशा प्रश्नांची सल तसलिमा नासरिन यांना टोचणी देत br> राहते. त्यातून त्या अंतर्मुख करणारे प्रश्न विचारतात. त्यांच्या या अभिव्यक्तीतून जणू समकालीन वास्तवाचा आरसा आपल्यासमोर उभा ठाकतो. आणि सामाजिक चिंतांकडे अंगुलीनिर्देश करत br> राहतो.
-
No Country For Women
This book is a collection of author?s essays which revolt against the status of women in this man made world. Author says that there is no place which belongs to women and hence they have to fight for every inch of ground to get their rightful place. She lambasts those who call themselves secular and pander to the fundamentalists. She exhorts them to rise above narrow interests and to think of the larger goal of the progress of society.
-
Aamar Meyebela (आमार मेयेबेला)
तसलिमा नासरिन या बंगाली लेखिकेचे नाव गेली काही वर्षे जगभर गाजत आहे. सलमान रश्दीप्रमाणे तसलिमा नासरिनवरही देश सोडून जाण्याची वेळ आली. आपल्या 'लज्जा' या कादंबरीत बंगालमधील हिंदू शेजार्यांवर झालेल्या अत्याचाराचे वर्णन केल्यामुळे तिला ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपली मते अभ्यासपूर्ण रीतीने, ठामपणे, निर्भीडतेने मांडणे हे तसलिमांच्या विचारसरणीचे बलस्थान आहे. तसलिमा अशा कशा घडल्या याचे उत्तर आपल्याला त्यांचे 'आमार मेयेबेला’ वाचून मिळते. आमार मेयेबेला म्हणजे 'माझा मुलगीपणाचा काळ’. वयाच्या तेरा-चौदा वर्षापर्यतच्या आठवणी या पुस्तकात आहेत. तिचे कुटुंब या लेखनातून वाचकांपुढे उभे राहते. त्यात कोठेही उदात्तीकरण केलेले नाही. व्यक्तिमत्त्वाचे वास्तव दर्शनच घडवलेले आहे. तसलिमाचे वडील रजब अली डॉक्टर आहेत. देखणे, बुद्धिवादी, अहंकारी आहेत. स्वत:च्या पुरुषपणाचा त्यांना अभिमान आहे. तर आई कुरूप, कमी शिकलेली आहे. आपला नवरा कधीही आपल्याला तलाक देईल या भीतीने कायम धास्तावलेली आहे. या विजोड जोडप्याला चार मुले आहेत. तसलिमा स्वत:चे पूर्वायुष्य, त्यातील व्यक्ती, त्यांचे वागणे, बोलणे, स्वभावविशेष याबद्दल औचित्य-अनौचित्याचे दडपण न ठेवता लिहिते. तसलिमांच्या व्यक्तिमत्त्वात आणि तिच्या पारिवारिक ताण्याबाण्याचा प्रभाव मोठाच पडलेला आहे. तसलिमांचे संवेदनशील मन पानोपानी प्रकट होते. तीच या लेखनाची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रसंगातून तसलिमाचं बंडखोर व्यक्तित्व वाचकाला जागवत राहते.
-
Farasi Premik(फरासि प्रेमिक)
मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची कहाणी 'फरासि प्रेमिक' ही कथा आहे, नीलांजना मंडल या बंगाली तरुणीची. उपाहारगृहमालक अणार्या किशनलालशी विवाह झाल्यानंतर ती पॅरिसमध्ये येते. पॅरिसमधल्या किशनलालच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये नीलाला सोनेरी पिंजर्यात कोंडल्यासारखं वाटतं. लग्नानंतर तिच्या आशा-आकांक्षा पूणृ हाणं तर बाजूलाच, पण घरात केवळ मोलकरीण आणि शयनेषू रंभा... एवढंच तिचं स्थान पाहून तिचा जीव घुसमटतो. या कंटाळवाण्या, निराशेच्या गर्तेत निघालेल्या आयुष्यातून कुठं मोरपिशी वाट फुटतेय का ? यासाठी नीला आतुर असते आणि अशा वेळी तिच्या अयुष्यात येतो बेनॉयर ड्यूपॉन्ट... गोरापान, निळ्याशार डोळ्यांचा राजबिंडा फ्रेंच तरुण, नीला त्याच्या प्रेमात आकंठ बुडते. बेनॉयर तिची पॅरिसमधल्या रस्त्यांशी, कॅफेजशी, कलादालनांशी ओळख करून देतो... नीलासमोर जणू सर्वस्वी नवं विश्व खुलं होतं. बेनॉयरशी तिचे अगदी उत्कट शारीरिक, भावबंध जुळलेले असतात. हळूहळू इथंही तिला स्वत:च्या आशा-आकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतात. अखेर बेनॉयरचं प्रथम प्राधान्य स्वत:ला आहे. त्याचं फक्त स्वत:वर प्रेम आहे... आपल्या प्रियतमेवर नाही, हे उमगल्यावर त्यांच्या संबंधांना पूर्णविराम मिळतो, पण तिच्या आत्मशोधाच्या मार्गाचा आत्ता तर कुठे प्रारंभ झालेला असतो... धाडसी संकल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडलेली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणार्या एका स्त्रीच्या मनोवस्थांचं वेधक चित्रण या कादंबरी आहे.
-
Lajja (लज्जा)
लज्जा’ ही तसलिमा नासरिन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूंचा केलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणार्या हिंदूंची केलेली कोंडी असा या कादंबरीचा विषय आहे. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडले आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेमाने लढलेले सुधामयबाबू, त्यांचा मुलगा सुरंजन, त्यांची कन्या माया (निलोचना), त्यांची पत्नी किरणमयी अशा चारजणांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची ही कथा आहे. धर्म आणि देश या गोष्टींमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. मूलतत्त्ववादी आपल्या कुटुंबाचा छळ करतात तरीही देशप्रेमाने, आदर्शवादाने भारावलेले हे कुटुंब जातीय सलोखा व्हावा म्हणून प्रयत्न करते. पण परिस्थिती विकोपाला गेली, हिंदूंची मानखंडना पाहिली आणि अखेर बांगलादेश सोडून भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रकार लज्जास्पद होता.
-
Fera (फेरा)
या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं... ह्या देशातून उर्दू बोलणार्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं ? मुसलमानांची मायभूमी न हाता, हा देश तर शेवटपर्यंत बंगाल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभा केलाय. ज्यांनी भारताचे तुकड केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुपणामुळं या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसमानांचा नाही; इथं भाषा महात्ताची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतारावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसर्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर! कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता- कोणा स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून....
-
Nirbachit Kalam (निर्बाचित कलाम)
पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे अधिकार आणि स्त्रीमुक्ती ह्यांविषयी जे काही बोलले जाते, त्यामध्ये बांगलादेशच्या लेखिका तसलिमा नासरिन यांचा आवाज नि:संशय सर्वाधिक वरचा आणि सर्वांत अधिक खळबळ माजविणारा आहे. रूढी न मानणार्या, वादविवादपटू आणि स्पष्टवक्त्या तसलिमा यांच्या ह्या पुस्तकामुळे बांगलादेशात प्रचंड वाद उठले आणि त्यामुळे तसलिमा चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या. त्यांच्या ह्याच धक्कादायक पुस्तकाला 'आनंद-पुरस्कार’ मिळाल्यामुळे आपल्या देशातही विविध स्तरांवर कुतूहल जागृत झाले. या विस्फोटक पुस्तकात मूळ लेखांबरोबरच, त्याच प्रकारच्या आणखी काही लेखांची भर घालण्यात आली आहे. या पुस्तकात, लेखिकेने आपल्या बालपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी, कोणताही आडपडदा न ठेवता, लिहिल्या आहेत. ह्या आठवणी अतिशय कटू आहेत; पण त्या अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्या आहेत, ह्यात शंका नाही. या पुस्तकात, पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोगवस्तू समजून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात, धर्मशास्त्र् सुद्धा, कशी बेडी अडकवू पाहते; एवढेच नाही, तर ईश्वरकल्पनेतही स्त्रीच्या छळाचे इंधन, अप्रत्यक्षपणे, कसे घातले गेले आहे, व्यवहारात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पतिपत्नी-संबंधांत - थोडक्यात संपूर्ण स्त्रीजीवनात - पुरुषांची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टी दखल देण्याची सवय कशी दिसून येते, ह्याविषयी आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत.
-
Nashta Meyer Nashta Gadya (नष्ट मेयेर नष्ट गद्य )
तसलिमा एका सुसंस्कृत समाजाचं स्वप्न बघते आहे. ज्या समाजात कोणाचीही पिळवणूक होणार नाही आणि कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असा समाज तिला अपेक्षित आहे. स्वत: नास्तिक असूनही, सुसंस्कृतपणा आणि संस्कृती जपणार्या काही जुन्या रूढी-परंपरांची तिला ओढ आहे. कोणावरही अन्याय झाल्यास तसलिमा अस्वस्थ होते, चिडते. म्हणूनच लीला नागसारख्या स्त्रीला तिचा देश नुसता विसरतच नाही, तर तिचं नावनिशाणही मिटवून टाकतो, तेव्हा ती तिच्या देशावर खरमरीत टीका करण्यासही मागंपुढं पाहत नाही. मीरा मुख्योपाध्याय या जागतिक दर्जाच्या शिल्पकार. पण पश्चिम बंगाल सरकार त्यांना योग्य तो मान देत नाही, म्हणून ती या सरकारवरही नाराज आहे. स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. 'माणूस’ म्हणून त्यांना जगू दिलं जात नाही. अशा परिस्थितीत ज्या स्त्रिया समाजाचा विरोध सहन करून, आपल्या ध्येयाच्या मार्गावरील अडथळे पार करून, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्याबद्दल तसलिमाला अतीव आदर वाटतो, ती भारावून जाते. लीला नाग, मीरा मुखोपाध्याय, हासिबा बुलमेर्काव्ह यांच्यावर लिहिलेले लेख याची साक्ष देतात. या पुस्तकातील शांतिनिकेतनमधील 'दोलेर दिना’चं वर्णन करणारा लेख इतर लेखांपेक्षा वेगळा वाटतो. या लेखातून तसलिमाची काव्यात्म वृत्ती, निखळ, निकोप आनंदाला आसुसलेलं मन आणि गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूरांविषयीचा आदर व्यक्त होतो. इथं स्तंभलेखिका तसलिमाऐवजी कवयित्री तसलिमा आपल्याला अचानक भेटते.
-
Lajja
The Duttas - Sudhamoy, Kironmoyee, and their two children, Suranjan and Maya - have lived in Bangladesh all their lives. Despite being part of the country's small Hindu community, that is terrorized at every opportunity by Muslim fundamentalists, they refuse to leave their country, as most of their friends and relatives have done. Sudhamoy, an atheist, believes with a naive mix of optimism and idealism that his motherland will not let him down... And then, on 6 December 1992, the Babri Masjid at Ayodhya in India is demolished by a mob of Hindu fundamentalists. The world condemns the incident but its fallout is felt most acutely in Bangladesh, where Muslim mobs begin to seek out and attack the Hindus... The nightmare inevitably arrives at the Duttas' doorstep - and their world begins to fall apart.