Fera (फेरा)

या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं... ह्या देशातून उर्दू बोलणार्‍या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं ? मुसलमानांची मायभूमी न हाता, हा देश तर शेवटपर्यंत बंगाल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभा केलाय. ज्यांनी भारताचे तुकड केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुपणामुळं या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसमानांचा नाही; इथं भाषा महात्ताची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतारावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसर्‍या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर! कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता- कोणा स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून....

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category