Nashta Meyer Nashta Gadya (नष्ट मेयेर नष्ट गद्य )

तसलिमा एका सुसंस्कृत समाजाचं स्वप्न बघते आहे. ज्या समाजात कोणाचीही पिळवणूक होणार नाही आणि कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असा समाज तिला अपेक्षित आहे. स्वत: नास्तिक असूनही, सुसंस्कृतपणा आणि संस्कृती जपणार्‍या काही जुन्या रूढी-परंपरांची तिला ओढ आहे. कोणावरही अन्याय झाल्यास तसलिमा अस्वस्थ होते, चिडते. म्हणूनच लीला नागसारख्या स्त्रीला तिचा देश नुसता विसरतच नाही, तर तिचं नावनिशाणही मिटवून टाकतो, तेव्हा ती तिच्या देशावर खरमरीत टीका करण्यासही मागंपुढं पाहत नाही. मीरा मुख्योपाध्याय या जागतिक दर्जाच्या शिल्पकार. पण पश्‍चिम बंगाल सरकार त्यांना योग्य तो मान देत नाही, म्हणून ती या सरकारवरही नाराज आहे. स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. 'माणूस’ म्हणून त्यांना जगू दिलं जात नाही. अशा परिस्थितीत ज्या स्त्रिया समाजाचा विरोध सहन करून, आपल्या ध्येयाच्या मार्गावरील अडथळे पार करून, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्याबद्दल तसलिमाला अतीव आदर वाटतो, ती भारावून जाते. लीला नाग, मीरा मुखोपाध्याय, हासिबा बुलमेर्काव्ह यांच्यावर लिहिलेले लेख याची साक्ष देतात. या पुस्तकातील शांतिनिकेतनमधील 'दोलेर दिना’चं वर्णन करणारा लेख इतर लेखांपेक्षा वेगळा वाटतो. या लेखातून तसलिमाची काव्यात्म वृत्ती, निखळ, निकोप आनंदाला आसुसलेलं मन आणि गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूरांविषयीचा आदर व्यक्त होतो. इथं स्तंभलेखिका तसलिमाऐवजी कवयित्री तसलिमा आपल्याला अचानक भेटते.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category