-
Life Without Limits (लाइफ विदाउट लिमिट्स)
निक व्होयचिच यांना जन्मत:च हात-पाय नाहीत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनात नकारात्मक विचार येत. एकदोनदा त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला; पण नंतर मात्र आपल्या व्यंगावर मात करत ते जीवनाला सामोरे गेले आणि त्यांचं जीवन आनंदाने, समाधानाने, यशाने भरून गेलं. ही यशोगाथा त्यांनी ‘जीवन अमर्याद’ या पुस्तकातून छायाचित्रांसह मांडली आहे. निकच्या जन्मानंतर त्याला स्वीकारायलाही त्याच्या आईवडिलांना वेळ लागला; पण नंतर त्यांनी वेगवेगळ्या सोयी करून निकला स्वावलंबी बनवलं. बद्धिमत्ता आणि जिद्द यांच्या जोरावर निकनी चांगलं शिक्षण घेतलं. त्यांच्यावर चित्रित केलेल्या व्हिडिओ क्लिप्स जगभरातील लोक पाहत असतात. तसेच स्वत:ची यशोगाथा सांगून लोकांना प्रेरित करण्यासाठी निक व्याख्याने देतात आणि एक व्याख्याता म्हणूनही जगभर त्यांची ख्याती झाली आहे. जगभर फिरताना त्यांना आलेले अनुभव आणि विपरीत परिस्थितीला सकारात्मकतेने सामोरे गेलेल्या लोकांची उदाहरणं, यांचा या पुस्तकात समावेश आहे. तेव्हा हे प्रेरणादायी पुस्तक सगळ्यांनी जरूर जरूर वाचलं पाहिजे.
-
Mruyushi Sharyat
हि कथा आहे, सर डग्लस मॉसन यांच्या अॅन्टाक्रिट खंडावरच्या साहसी मोहिमांची … त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुभवलेली थरारांची… आणि मृत्यूच्या करल दाढेतून जिवलगांची जिद्धीने केलेल्या सुटकेची … हि कथा आहे. मानवी स्वभावातील कंगोरयांनची… राज्य विस्तारासाठीच्या संघर्षाची …. आणि पृथ्वीवरचे जैववैविध्य राखण्यासाठी झटनाऱ्यांची … हि कथा आहे, अथक मानवी प्रयत्नाची…ज्ञानलालसेची आणि कल्पनेपलीकडे असलेल्या निसर्गाची विलोभनीय; पण अकराळ रुपाची; त्याच्या दर्शनाची; त्याच्या साक्षात्काराची!