-
Hari Hari Vitthal Vitthal (हरी हरी विठ्ठल विठ्ठल)
अवती-भवती घडणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर मला काही बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. उदाहरणार्थ- 'लिव्ह इन रिलेशनशिप' म्हणजे तरुण- तरुणींनी लग्नाशिवाय कंत्राटी पद्धतीने एका छपराखाली राहणे. श्रीमंतांची किंवा राजकीय वरदहस्त असलेली तरुण पोरे दारू पिऊन, बेफाम वेगाने कार चालवून फुटपाथवरची माणसे चिरडतात, राजकीय लागेबांधे असलेले सावकार कुळांना नाडतात व त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणतात. लग्नाची वचने देऊन पुरुष स्त्रीला फसवतात, शिकली-सवरलेली माणसे बुवाबाजीला बळी पडतात, कौटुंबिक वाद व गैरसमज यामुळे भांडणे धुमसतात व आत्महत्येपर्यंत पोहोचतात, चांगल्या घरातील मुले अपघाताने गुन्हेगारी विश्वात ओढली जातात, ऑफिसातील स्त्रियांची लैंगिक छळवणूक, स्त्री-भ्रूणहत्या, डॉक्टरांकडून होणारी सहकारी गृहसंस्थांची पिळवणूक अशा विषयांवरच्या बातम्या मी वाचतो, पाहतो व ऐकतो. हे विषय न संपणारे आहेत. १९९२ साली, नोकरीतून निवृत्त झाल्यावर साठाव्या वर्षापासून, या चिरंजीव विषयांवर, २०२३ या चालू वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ वर्षांपर्यंत मी कथा लिहितो आहे. माझ्या कथा कालबाह्य होत नाहीत. कारण गैरप्रकार वेष पालटून पुन्हा पुन्हा जन्म घेतात. माझ्या कथांची अखेर मी आनंददायी करतोच करतो. मला रडवणाऱ्या कथा लिहिताच येत नाहीत. ही माझी लेखनमर्यादा मला मान्य केलीच पाहिजे!
-
Jeshthansathi 4 Goshti Yuktichya (ज्येष्ठांसाठी ४
आज बदललेल्या जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंबाचं विभाजन होऊन विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढलं आहे. कोणाला वेळ द्यायला किंवा कोणाचा वेळ घ्यायलाही आपल्याकडे फुरसत नसते. तरीही, बरीच कुटुंबं अशी आहेत जी गुण्यागोविंदाने एकत्र राहाता आहेत, एकमेकांशी संवाद ठेवून आहेत. अशा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांसाठी भा. ल. महाबळ काही बोलक्या व्यक्तिरेखांमधून व प्रसंगांतून नात्यात जाणवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नकळत मार्गदर्शन करून जातात. घरात सशक्त व आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी घरातील सदस्य -- विशेषत: ज्येष्ठ व्यक्ती विधायक व परिपक्व भूमिका बजावू शकतात. कुटुंबातील प्रत्येकाने विचारपूर्वक कृती केल्या व दुसऱ्याचा विचार केला तर कुटुंब कसं सुखी व समाधानी राहू शकतं हे लेखक विविध लेखांमधून पटवून देतात. नुसतं वयाने 'ज्येष्ठ' न राहता वागण्यातून 'ज्येष्ठ' होण्यासाठी ज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या....