-
Zada Lavanara Manus (झाडं लावणारा माणूस)
एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर मोहीनी घातलेली आहे.
-
Vachu Anande Kumar Gat 2 (वाचू आनंदे कुमार गट २)
पुस्तकं आपल्याला कल्पनेच्या जगात घेउन जातात, स्वप्नं दाखवतात, पण त्याचबरोबर आपण पाहत असलेल, ज्यामध्ये आपण जगत असतो ते जगही समजून घ्यायला शिकवतात. शब्दांमधून जसं जग दिसतं, जाणवतं तसंच रंगरेषांमधूनही जाणवतं आणि तेही तितकंच मनोहारी असतं. शब्द आणि रेषांचं जग बरोबरीनं अनुभवता आलं तर आपलं जगाकडे पाहणं अधिक सुंदर होतं. वाचनाची थोडीफार ओळख झालेल्या मुलामुलींना चांगल्या साहित्याच्या वाचनाची गोडी लागावी आणि त्याच बरोबर शाळेत अभ्यासासाठी असलेल्या विविध विषयांचे त्यांचे आकलन अधिक वाढावे या दृष्टीकोनातून या पुस्तकांच्या संचाची निर्मिती करण्यात आली आहे.
-
Vachu Anande Kumar Gat 1 (वाचू आनंदे कुमार गट १ )

हॅनाची सुटकेस (Hanachi Suitcase)
मुलांच्या आणि मोठ्यांच्या ही हृदयाला स्पर्श करणारी विलक्षण सत्यकथा!