-
Dr.Snehasudha Yanchya Nivadak Kavita (डॉ.स्नेहसुधा
डॉ स्नेहसुधा कुलकर्णी यांनी विविध काव्यगुणांनी समृध्द आणि संपन्न अशी कविता विपुल प्रमाणात लिहिलेली आहे. ती सहा काव्यसंग्रहांमधून व मान्यवर नियतकालिकांमधून काव्यप्रेमी रसिकांपुढे सातत्याने आली आहे. त्यांच्या एकुण ४६५ कवितांमधील १५१ कवितांची निवड केली असून त्यामध्ये छंदोबध्द आणि मुक्तच्छंद अशा दोन्ही प्रकारच्या कविता आहेत. छंदोबध्द कवितांमध्ये भावकविता, भावगीत, गौरवगीत, उद्देशिका, ओवी, अभंग, लावणी, गझल असे प्रकार असून प्रेमकविता, सामाजिक कविता, निसर्गकविता, आत्मचिंतनपर कविता, विनोदी कविता, विडंबनगीत, असे प्रकारही त्यांनी हाताळले आहेत.
-
Marathi Katha: Good,Bhaya va Rahasya (मराठी कथा: ग
आदिम काळापासून माणसाच्या कल्पनाशक्तीला असलेल अज्ञाताचं, अदभुताच आकर्षण काळाचा ओघात विविध रूप घेत प्रगटत राहिलं. आधुनिक वाड्मयातही गूढकथा,भयकथा, रहस्यकथा यांनी मोठा वाचकवर्ग आपल्याकडे खेचून घेतला आहे. अनेकांना त्यांनी वाचनाची गोडी लागली आहे. अस असूनही आजवर हे कथाप्रकार उपेक्षितच राहिले होते. कल्पनेण गुंफलेल्या या सावल्यांच्या नक्षीच विणकाम तपासून पाहण्याचा, त्याची परपंरा आणि साहित्य व्यहारातल स्थान अज मावण्याचा एक प्रयत्न म्हणजे 'मराठी कथा : गूढ,भय व रहस्य'