-
Nisargaputra (निसर्गपुत्र)
‘निसर्गपुत्र’ ही अॅड्रियन बोशियरच्या जीवनाचे सत्य सांगणारी कादंबरी. आई पुनर्विवाह करते,नवे वडील द. आप्रिÂकेत कुटुंबास आणतात. तेव्हा १६ वर्षांचा ब्रोशियर दक्षिण आप्रिÂकेतील रानावनात भटकून सत्य व खडतर अनुभव सोसतो. शिंगविहिन- प्रकरणात रक्ताला महत्त्व, त्यामुळे बोकड कापून बोशियरवर प्रथम धार्मिक विधी केला जातो. मोहलासाना: झुडुप- वाटेत दिसणार्या झाडांची, पाना-फुलांची औषधी माहिती बोशियर मिळवतो. मोरारा: महान वेल- सर्व प्रकारच्या मांत्रिकांना, वैदूंना वनऔषधींबद्दलचे ज्ञान असते. एका रुग्णाचा पाय कापायचे निदान होते, पण अतिमहत्त्वाच्या कामास तो रुग्णालयातून बाहेर पडतो व वैदू वनौषधीने त्याचा पाय न कापता बरा करतो. तेमोसो: पूर्वसूचना-आदिवासीं-वैदूंच्या ज्ञानातून पूर्वकल्पनेने दैनंदिन जगणे सोपे व आजारही बरे केले जातात. जमीन-भूमीला येथे महत्त्व. इ.स.१९२० मध्ये गर्टरूड कॅटन-थॉम्सन या ब्रिटिश पुरातत्त्ववेत्तीने आप्रिÂका पालथी घालून, नवे उत्खनन करून खरी संस्कृती जगापुढे आणली. ब्रोशियरनेही अल्प भटकंतीतून-जिव्हाळ्याने अभ्यास केला, म्हणूनच प्रो. रेमंड डार्ट यांनी आपल्या या हुशार शिष्याला नवदृष्टी-नवप्रेरणा व त्याच्या भटकंतीला योग्य दिशा दिली. या १६प्रकरणांतून निसर्गपुत्र बोशियरचे विश्वातील महान कार्य दिसते. हा निसर्गपुत्र आपली ‘जीवनगाथा’ लिहण्याचा प्रयत्न करतो; पण पोहताना अपस्माराच्या झटक्याने १९७८ ला त्याचे निधन होते.
-
Laingiktevar Bolu Kahi (लैंगिकतेवार बोलू काही)
लैंगिकता किंवा सेक्स हा विषय माणसाला अनादि काळापासून व्यापून आहे. या विषयाबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असते; पण त्याबद्दचं ज्ञान फारच कमी असतं. माणसाचं लैंगिक वर्तन जसं असतं तसं ते का असतं, लैंगिक वर्तनाची उत्क्रांती कशी होत गेली आहे, आदिम समाजांमध्ये लैंगिकतेकडे कसं पाहिलं जात होतं, जगभरात या विषयाबाबत कोणते समज-अपसमज-अंधश्रद्धा प्रचलित आहेत, त्या अंधश्रद्धांबद्दल समाजशास्त्रज्ञांच-लैंगिक तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, या विषयात कोणकोणती संशोधनं झाली आहेत याचा आढावा घेणार पुस्तक. ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी त्यांच्या व्यासंगाच्या आधारे लिहिलेलं.
-
Marathi Katha: Good,Bhaya va Rahasya (मराठी कथा: ग
आदिम काळापासून माणसाच्या कल्पनाशक्तीला असलेल अज्ञाताचं, अदभुताच आकर्षण काळाचा ओघात विविध रूप घेत प्रगटत राहिलं. आधुनिक वाड्मयातही गूढकथा,भयकथा, रहस्यकथा यांनी मोठा वाचकवर्ग आपल्याकडे खेचून घेतला आहे. अनेकांना त्यांनी वाचनाची गोडी लागली आहे. अस असूनही आजवर हे कथाप्रकार उपेक्षितच राहिले होते. कल्पनेण गुंफलेल्या या सावल्यांच्या नक्षीच विणकाम तपासून पाहण्याचा, त्याची परपंरा आणि साहित्य व्यहारातल स्थान अज मावण्याचा एक प्रयत्न म्हणजे 'मराठी कथा : गूढ,भय व रहस्य'
-
Manvantar. (मन्वंतर)
एकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय,पण त्याचवेळी आजच्या तंत्र विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं,अगदी झपाटून विज्ञानकथांच लेखन करतानाही दिसतायेत. त्यांच्या कथांमधून मग कधी,तंत्राशास्त्राच्या प्रगतीनं वेठीला धरलेलं. मानवी जग डोकावतं, तर कधी दृश्य जगापल्याडच्या अव्यक्त दुनियेची तीव्र असोशी अभिव्यक्त होत राहते. अनेकदा कालगतीच्या संदर्भात केलेलं घटित-अघटीताच सूक्ष्म अन्वेषण तर वाचकाला पुरतं चक्रावून सोडतं. एकंदरच ज्ञान-विज्ञानातील गृहीत-कल्पित परीमाणांना साकारणाऱ्या या विज्ञानकथा वाचकाच्या मनाचा नेमका ठाव घेतात.
-
Swapanranjan (स्वप्नरंजन )
राजू फातरफेकर हा एक महाविद्यालयीन तरुण.त्याला हीरो बनावं असं वाटत असतं. त्याला ते जमत नसतं. मुलींशी बोलांव असं त्याला वाटतं पण तेही त्याला जमात नसतं.मग एक चमत्कार होतो. त्याचा औश्यात एकदम तीन-तीन मुली येतात. त्यांची नंख खायची सवय जाते.तो धड्याक्यानं हीरो तर बनतो पण तय नंतर त्याचा आयुष्यात आलेल्या तिघिही एक एक करूँ कटतात. कुनाचं लग्न होतं, कुणाच्या पत्रिकेत मंगल असतो. राजुला त्याचा क्रीडा कैशाल्यामुळे मुंबईत नोकरी मिळत असते म्हणून आईला त्याचा लग्नाची घाई असते. मग काय घडतं? हे गीता रहस्य सोदावायचं तर 'स्वप्नरंजन' करायलाच हव.
-
Sambhav-Asambhav (संभाव असंभव)
माणसाच्या आकलनापलीकडे काही अदृश्य, पारलौकिक, अधिभौतिक स्वरूपाच्या शक्ती आहेत, अशी समजूत माणूस बाळगून आहे. देव या संकल्पनेवरची श्रद्धा ही त्यातली सर्वांत आदिम. पण देवाप्रमाणेच माणसाचा आत्मा, साक्षात्काराचे अनुभव, समाधिवस्था, आतला आवाज, मृत्युसमीप व मृत्युपश्चात अनुभव यांवरही लोक विश्वास बाळगून असतात. माणसाच्या या श्रद्धांचा जगभरातले शास्त्रज्ञ गेली कित्येक वर्षं रीतसर अभ्यास करत आहेत. विज्ञानाच्या कसोटीवर माणसाच्या समजुती तपासून पाहत आहेत. या संशोधनाचा आणि त्यातून निघणा-या निष्कर्षांचा धांडोळा.
-
American Chitrapatsrushti (अमेरिकन चित्रपटसृष्टी )
हिच कॉकचे 'फ्रेन्झी' आणि 'द अदर' ,'द ईगल हॅज लॅन्डेड', 'कॅसाब्लान्का' अशा गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा चार्ल्स ब्रोस्नन सारख्या एके काळच्या 'रफ आणि टफ' माणसाचे कथा आणि काही गाजलेल्या चित्रपटांच्या निर्मिती मागच्या कहाण्या आपल्याला 'अमेरिकन चित्रसृष्टी' च्या अदभूत जगाचे दर्शन घडवतात. तर असे युद्धपट भारतात का निर्माण होत नाहीत आणि इतर लेख आपल्याला विचार करायला भाग पडतात. या फक्त चित्रपट कथा नाहीत तर एका सजग प्रेक्षकाचे विचारही इथे समोर येतात आणि अमेरिकन चित्रपटांकडे आपण नव्या दृष्टीने पाहू लागतो.