-
Ranjhunjar
ह्या कथा नुसत्याच रम्य नसतात, तर त्यातून युद्धाच्या विविध पैलूंच दर्शन घडतं. दुसर्या महायुद्धात युरोप अमेरिकेतील तरुण पिढी कापली गेली. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी अतुलनीय शौर्य दाखवलं. त्या युद्धातील ह्या कथा मराठी वाचकाला युद्धाचे यथार्थ दर्शन घडवतील. भारत आज ज्या परिस्थितीतून जात आहे, ते पाहता तरुण पिढीस युद्धाची निदान तोंड ओळख होणं तरी आवश्यक वाटते. आजच्या 'रिमोट कंट्रोल' युगात वैयक्तिक शौर्याला वाव नसतो असं म्हटलं जातं, पण तसं त्या युद्धात नव्हतं. अशा कथा वैयक्तिक शौर्याच्या कथा वाचकांना नक्कीच आवडतील.
-
Jidnyasapurti
विज्ञानविषयी उत्कृष्ट व रंजक लेखक करणार्यात निरंजन घाटे हे नाव आज आघाडीवर आहे. विज्ञान विषयावर श्री घाटे यांनी अनेक पुस्तके लिहिली असून ती वाचकप्रिय ठरली आहेत. 'जिज्ञासापूर्ती’ हा विषयही सदैव कुतूहल निर्माण करणारा आहे हे ओळखूनच त्यांनी या पुस्तकांची निर्मिती केली असावी. कारण सध्याच्या स्पर्धात्मक जगात चौफेर ज्ञानास खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षा, दूरचित्रवाणी वाहिन्यावरील प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम या प्रकारामुळे तर हा विषय परवलीचा ठरला आहे. या पुस्तकात एकूण 69 छोटे छोटे लेख समाविष्ट असून अनेक, लेखांना चित्रांचीही जोड दिलेली आहे. पृथ्वीचे वातावरण खरेच तापते आहे का ? रात्रपाळी करण्यामुळे त्रास होतो का ? क्लिओपात्रा खरंच अस्तित्वात होती का ? जाड माणसे अधाशी असतात का ? मंगळावर सजीव आहेत की नाहीत? उडत्या तबकड्यांचे गूढ, पैशाचा जन्म कधी झाला ? स्त्री आणि विज्ञान यांचे का पटत नाही ? चंद्रावर पाणी आहे का ? अशी अनेक प्रश्नांचे कुतूहल आपल्या 69 लेखांतून शमविण्याचा श्री. घाटे यांनी प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील सर्व लेख वाचून, नीट समजावून घेतले तरी वाचकांच्या सामान्यज्ञानात भर पडल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना अनेक भौगोलिक प्रश्नोत्तराचे भांडार म्हणून वाचक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करील. यात शंका नाही.
-
Jeevanchakra
उद्याच्या कथेत वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञान विषयक माहिती असणे अपरिहार्य होवून बसणार आहे. खरंतर त्या कथा त्या काळातील सामजिक कथा असतील. त्यामुळे विज्ञानकथा लिहिणं खूप आव्हानात्मक ठारेल. कमी श्रमात मोठं व्हायची स्वप्न बघणा-यांना हे आव्हान पेलवेल का हा प्रश्न आहे. त्यामुळे नवे विज्ञानकथाकार पुढं येणं हे सोपं राहणार नाही. त्याचं कारण विज्ञान कथेत विज्ञान आणि कथा यांचा समतोल साधणं आवश्यक असतं. एखादं यंत्र चालतं हे समजावून देण्यापेक्षा एखाद्या यंत्राचा मानवीजीवनावर कसा परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरतं. अशा त-हेच्या भविष्यकाळातील प्रगतीचा आणि मानवी परस्पर संबंधांचं चित्रण करणा-या या कथा वाचकांना आवडतील यात शंकाच नाही.
-
Aaplya Purvjanche Vidnyan
आजच्या विज्ञानयुगाची किमया केवळ अफाट आणि पावलोपावली अचंबित करणारी... या सा-यांची मुळं जरा खणून पाहिली, हजारो-शेकडो वर्षांच्या इतिहासाची पानं खोलवर चाळून पाहिली आणि भूतकाळातल्या शृंखलांना एक-एक जोडून पाहिलं तर समजून येतं की, पूर्वजांच्या ज्ञानार्जनाचं आणि सखोल संशोधनाचंच फलित मिरवतोय आपण... एकंदरीतच, आजच्या विज्ञानयुगाची अलौकिक बीजं पूर्वजांनीच खोलवर रुजवलीत. याच अद्भुत शोधांचा कालौघात लुप्त झालेल्या सांस्कृतिक मूल्यांचा माहितीपूर्ण खजिना!