Jeevanchakra
उद्याच्या कथेत वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञान विषयक माहिती असणे अपरिहार्य होवून बसणार आहे. खरंतर त्या कथा त्या काळातील सामजिक कथा असतील. त्यामुळे विज्ञानकथा लिहिणं खूप आव्हानात्मक ठारेल. कमी श्रमात मोठं व्हायची स्वप्न बघणा-यांना हे आव्हान पेलवेल का हा प्रश्न आहे. त्यामुळे नवे विज्ञानकथाकार पुढं येणं हे सोपं राहणार नाही. त्याचं कारण विज्ञान कथेत विज्ञान आणि कथा यांचा समतोल साधणं आवश्यक असतं. एखादं यंत्र चालतं हे समजावून देण्यापेक्षा एखाद्या यंत्राचा मानवीजीवनावर कसा परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरतं. अशा त-हेच्या भविष्यकाळातील प्रगतीचा आणि मानवी परस्पर संबंधांचं चित्रण करणा-या या कथा वाचकांना आवडतील यात शंकाच नाही.