-
Mahagatha Puranatil 100 Katha (महागाथा पुराणातील १
हिंदू धर्मामधील पुराणांमध्ये विश्वामधील ज्ञानभंडार सामावलं आहे. सातत्याने उत्तरं शोधणाऱ्यांसाठी पुराणकथांचं महत्त्व कालातीत आहे. ह्या प्राचीन ग्रंथांमधील शंभर निवडक पौराणिक कथांची सचित्र-संकलित आवृत्ती प्रथमच प्रकाशित होत आहे. देव, असुर, ऋषी आणि सम्राट ह्यांच्या लोकप्रिय कथा या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्या आहेतच; पण लेखक सत्यार्थ नायक यांनी फारशा ज्ञात नसलेल्या अनेक कहाण्यांचा शोध घेऊन, त्यांचाही अंतर्भाव यात केला आहे. उदाहरणार्थ, विष्णूचा शिरच्छेद; सरस्वती लक्ष्मीला शाप देते, तसंच हरिश्चंद्र वरुणदेवाला फसवतो... या आणि यांसारख्या कथा फारच कमी लोकांनी ऐकल्या असतील. सत्यार्थ नायक यांनी ह्या शंभर कहाण्यांची कालक्रमानुसार मांडणी करून त्या 'नव्या' स्वरूपात सादर केल्या आहेत. सत्ययुगामधील विश्वनिर्मितीपासून सुरू झालेल्या कथांची अखेर कलियुगाच्या आगमनाशी होते. पौराणिक संदर्भ देत त्यांनी चार युगांचा मोठा आवाका असलेल्या वेगवान कथनाची वेधक बांधणी केली आहे. एकूणएक कथा या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. ब्रह्मांडामध्ये घटनांची विलक्षण अशी एक साखळी दिसून येते. प्रत्येक घटनेला एक पार्श्वभूमी आहे. वर्तमानकाळ हा भूतकाळाला आणि भविष्यकाळाला जोडलेला असतो. कारण आणि परिणाम यांची अखंड साखळी त्यात आहे. कर्म आणि कर्मफलाचं वर्तुळ पूर्ण होतं.
-
Guide (गाइड)
आर क़े .नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक . त्यांच्या ' द गाइड ' या इंग्रजी कादंबरीला १९६० मध्ये ' साहित्य अकादमी ' पुरस्कार प्राप्त झाला आणि एका श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली . १९६५ मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ' गाइड' हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कांदबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी ,तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या . आज पाच दशंक उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले . एका सामान्य भोगवादी राजू गाइडच अध्यात्मिक 'स्वामी 'मध्ये रुपांतर होऊ शकत ? एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेण , राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चोकटीत बसत? मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता ? तो योग्य होता का ? यांसारखा अनेक प्रश्नांचा उलगडा हि कांदबरी वाचल्याशिवाय होण अशक्यच . सर्जनशीलतेचा ध्यास,ज्ञान-संशोधनाच ध्यास , भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणाऱ्या मूळ इग्रजी कांदबरीचा उल्का राउत यांनी सिद्ध केलेला हा अनुवाद कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी , अत्यंत रोचक व तत्वाण्यानात्मक डूब असलेली हि कांदबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते-गाइड