Mahagatha Puranatil 100 Katha (महागाथा पुराणातील १

हिंदू धर्मामधील पुराणांमध्ये विश्वामधील ज्ञानभंडार सामावलं आहे. सातत्याने उत्तरं शोधणाऱ्यांसाठी पुराणकथांचं महत्त्व कालातीत आहे. ह्या प्राचीन ग्रंथांमधील शंभर निवडक पौराणिक कथांची सचित्र-संकलित आवृत्ती प्रथमच प्रकाशित होत आहे. देव, असुर, ऋषी आणि सम्राट ह्यांच्या लोकप्रिय कथा या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्या आहेतच; पण लेखक सत्यार्थ नायक यांनी फारशा ज्ञात नसलेल्या अनेक कहाण्यांचा शोध घेऊन, त्यांचाही अंतर्भाव यात केला आहे. उदाहरणार्थ, विष्णूचा शिरच्छेद; सरस्वती लक्ष्मीला शाप देते, तसंच हरिश्चंद्र वरुणदेवाला फसवतो... या आणि यांसारख्या कथा फारच कमी लोकांनी ऐकल्या असतील. सत्यार्थ नायक यांनी ह्या शंभर कहाण्यांची कालक्रमानुसार मांडणी करून त्या 'नव्या' स्वरूपात सादर केल्या आहेत. सत्ययुगामधील विश्वनिर्मितीपासून सुरू झालेल्या कथांची अखेर कलियुगाच्या आगमनाशी होते. पौराणिक संदर्भ देत त्यांनी चार युगांचा मोठा आवाका असलेल्या वेगवान कथनाची वेधक बांधणी केली आहे. एकूणएक कथा या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. ब्रह्मांडामध्ये घटनांची विलक्षण अशी एक साखळी दिसून येते. प्रत्येक घटनेला एक पार्श्वभूमी आहे. वर्तमानकाळ हा भूतकाळाला आणि भविष्यकाळाला जोडलेला असतो. कारण आणि परिणाम यांची अखंड साखळी त्यात आहे. कर्म आणि कर्मफलाचं वर्तुळ पूर्ण होतं.

Book Details

ADD TO BAG