Swasthya Trikon
शरीर आणि श्रम ; बुद्धी आणि ज्ञान; मन आणि मनन या तीनही गोष्टी ताळमोल राखून कार्य करतील. शरीरातील सारया प्रणाली, त्याचप्रमाणे सर्व अंग सहज आणि स्वतंत्र कार्य करत असतील. शरीरात आळस नसतील व ते सतत कार्यरत राहावं यासाठी कुठल्याही बाह्य व्यसनाची आवश्यकता पडत नसेल… मन, विचार आणि वाणी सम्यक असेल, मानत बे चे नी किंवा दुसरयांसाठी तिरस्कार नसेल, शरीराची सारी अंगे आणि क्रिया संतुलित असतील… वात पित्त आणि कफ या तिनेही गोष्टी नियंत्रित असतील, पचनशक्ती नियमित आणि संतुलित असेल, भूक वेळेच्या वेळी लागत असेल, जेवणानंतर तृप्तीचा अनुभव येत असेल… निद्रा स्वभाविक असेल, घशाला शोष पडून किंवा भयानक स्वप्नांमुळे झोपमोड होत नसेल आणि रोग्य प्रमाणे सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत नसेल… कंबर सरळ, प्रमाणबद्ध आणि बळकट असेल, चेहरा प्रसन्न, डोळे चमकदार, नाडीची गती मध्यम शरीराचं तापमान संतुलित असेल आपलं काम पूर्णक्षमतेनं करण्यासाठी आपण सक्षम असाल इंद्रियांवर आपलं पूर्ण नियंत्रण असेल… तणाव आणि चिंतेपासून आपण सदैव मुक्त असाल आणि उत्साहानं जीवन जगत असाल… तन मन आणि उर्जेच्या एकरूपतेचं नाव म्हणजे स्वास्थ्य… स्वास्थ्याच्या खरा अर्थ आहे 'स्व' मध्ये स्थित होणं स्वस्थ माणूसच 'स्व' मध्ये स्थित होतो. तो रोग मुक्त असतोच त्याचप्रमाणे 'स्व' अर्क युक्तदेखील असतो. या स्व अर्कामुळे माणसाला स्वर्गात राहिल्याची, आनंदात असल्याची जाणीव होते.