Salt And Honey

कोबा! वर्णद्वेषाच्या वणव्यात होरपळणार्‍या दक्षिणी आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या भटक्या आदिवासी जमातीतली एक लहानगी! गोर्‍या लोकांच्या शिकारी चमूकडून आपल्या आईवडिलांची झालेली निर्घृण हत्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या जगापासून दूर, त्या गोर्‍यांच्या जगात नेलं जातं. त्या सुंदर पण तिच्यासाठी धोक्याच्या असलेल्या जगाशी जुळवून घ्यायला. त्यात टिकाव धरायला ती हळूहळू शिकते. तरीही एक जीवघेणी जाणीव तिला सतत टोचणी लावून असते ती म्हणजे त्यांच्यापासून पूर्णपणे तोडले जायचे नसेल तर तिला त्या माणसांचा, ज्यांच्यावर तिचा जीव जडला आहे, त्यांचा त्याग करावाच लागेल.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category