First Person

By (author) Lalita Tamhane / Priya Tendulkar Publisher Dimple

कॉलेजमध्ये असताना काही कामाच्या निमित्ताने दोन-तीन वेळा विजय तेंडुलकर यांच्या घरी जाणे झाले. तेव्हा कधी वाटलेही नव्हते, की त्यांच्या मुलीशी-प्रियाशी - पुढे माझी इतकी दाट मैत्री होईल! 'रजनी'च्या रुपात एक अभिनेत्री म्हणून अल्पावधीत लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी प्रिया मला मात्र जास्त भावली, ती एक लेखिका म्हणून! पण, 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या 'बॉम्बे टाइम्स' पुरवणीतील प्रियाचे 'फर्स्ट पर्सन' नावाचे इंग्रजी सदर वाचताना कधी कल्पनाही केली नव्हती, की याचा मराठी अनुवाद करायची जबाबदारी माझ्यावर येणार आहे आणि तीसुध्दा प्रियाच्या पश्चात् ! प्रियाची धाकटी बहीण तनुजा हिच्या आग्रहामुळेच मी प्रियाच्या 'फर्स्ट पर्सन'चा अनुवाद केलाय. प्रियाच्या मूळ लेखनशैलीला धक्का लागून न देण्याचा माझ्याकडून तरी मी प्रामाणिक प्रयत्न केलाय.

Book Details

ADD TO BAG