Pray Savaj ( प्रे सावज )

पृथ्वीतलावरील प्रचंड प्रजातींपैकी फक्त मानव, चिम्पँझी व ओरंगउटान ह्यांच्यात स्वत्वाची जाणीव असते. तरीही आपल्यामधला स्वत:बद्दलचा भ्रम हा मानवजातीचा खास गुणधर्म आहे. एकविसाव्या शतकात कधीतरी आपल्या या संभ्रमातून उद्भवलेल्या बेदरकारपणाची आणि वाढत्या तंत्रज्ञानामधील शक्तीची टक्कर होणार आहे. ही टक्कर नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि संगणक तंत्रज्ञान यात घडून येईल. ह्या तीनही तंत्रज्ञानामधील नॅनो तंत्रज्ञान सर्वात नवीन आहे. ह्यामध्ये अत्यंत सूक्ष्म यंत्रे, म्हणजे मानवी केसांच्या जाडीपेक्षा १००० पट लहान आकाराची यंत्रे बनवण्याचा ध्यास घेतलेला आहे. याद्वारे येत्या पन्नास-शंभर वर्षात नवीन प्रकारचे सजीव उदयाला येण्याची शक्यता आहे. मानवाने त्यांची रचना केली, म्हणून त्यांना कृत्रिम म्हणता येईल. पण ते पुनरुत्पादन करू शकतील.... त्यांची उत्क्रांती फारच वेगळ्या पद्धतीने आणि प्रचंड वेगाने होईल.... त्यांचा मानवजातीवर आणि जैवमंडलावर होणारा परिणाम विलक्षण असेल.... स्वत:ला प्रगत करू शकणार्‍या अतिसूक्ष्म शिकारी यंत्रमानवांच्या एका झुंडीवरचा संशोधकांचा ताबा सुटतो आणि.... भविष्यात घडू शकेल अशी थरारक विज्ञानकथा

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category