Samvadini

By (author) Va.Pu.Kale Publisher Mehta Publishing House

रात्री अकरा वाजता घरी जातो. उर्मिला जागी असली तर म्हणते, "किती दमता तुम्ही !" - बस्स ! सगळा दिवस सार्थकी लागतो. ह्या एका वाक्याची माणसाला केवढी भूक असते, हे सांगता येणार नाही. दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बायकोलाही एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून परतलेल्या नवर्‍याला पण !" समस्या आपली आणि त्याचं उत्तर मात्र इतरत्र, असं घडत नाही. उत्तराची मागची बाजू म्हणजेच समस्या. आपण फक्त बघण्याची दिशा बदलायची. लोकप्रिय कथाकार व. पु. काळे यांची प्रत्येक कथा म्हणजे एक आगळाच अनुभव असतो. याचं कारण, मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणसांची सुखदु:खं, हर्ष, खेद, आनंद, धावपळीच्या जीवनातला त्यांचा संघर्ष, नोकरदारांच्या नानाविध समस्या, कुचंबणा, लैंगिक जीवनातले ताणतणाव, मान-अपमान - जे एरवी कुणाच्या लक्षातही येत नाही, ते सगळं वपुंच्या मनाला भिडतं. वपु ते अलगद टिपतात आणि आपल्या सहज मिस्कील शैलीत वाचकांच्या मनात उतरवतात ! त्यांची जीवनदृष्टीच इतकी आशावादी, प्रसन्न आणि मिस्कील आहे, की त्या रंगांत रंगूनच त्यांच्या अनुभवाचा प्रत्येक क्षण चैतन्यानं खुलतो ! 'संवादिनी’मध्ये तर संवादांतून कथा फुलवणारी त्यांची शैली वाचकाला थक्क करते !

Book Details

ADD TO BAG