Rashtirya Swayamsewak Sanghane Gamawaleli Varse( र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. संजीव केळकर यांनी संघाच्या कार्यपद्धतीचे या पुस्तकात विश्‍लेषण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेल्या काही मंडळींपैकी दोघा-तिघा मंडळींनी जी पुस्तके लिहिली त्यापेक्षा हे पुस्तक वेगळे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबद्दल आस्था असतानाही केळकर यांनी येथे कठोर चिकित्सा केली आहे. संघाला गोळवलकर यांच्या मार्गाने यश मिळणार नाही, तर देवरस यांच्या सर्वसमावेशक पद्धतीनेच उज्ज्वल काळ असेल, असे मत लेखक मांडतात. गोळवलकर यांनी संघाच्या कामाची दिशा बदलली. त्यामुळे संघटनेचे बरेच नुकसान झाले. केळकर यांनी अनेक पुस्तकांचे संदर्भ घेऊन, विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून केळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अशोक पाध्ये यांनी मराठी अनुवाद केला आहे. अभ्यासक आणि सामान्य वाचक दोघांनाही हे पुस्तक आवडेल.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category