Mahananda (महानंदा)
महानंदा ! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती, अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ती संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रेमकथा ! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण भाबडेपण नाही. किंबहुना ही प्रेमकथा असली, तरी ती एका ‘जुगारा’चीच चटका लावणारी कथा आहे, असे म्हणावे लागेल !