Chidgosh (चिदघोष)
नवकथा ज्या काळात बहराला येत होती, त्या काळात, म्हणजे 1949 साली, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी ‘सत्यकथे’सारख्या दर्जेदार मासिकात आपल्या कथालेखनाला सुरुवात केली. ‘चिद्घोष’पासून ‘प्रस्थान’ पर्यंत या कथालेखनात कधी खंड पडला नाही. अनुभूतीची खोली व विविधता, तंत्राचा जागरूक शोध आणि दीघकर्थेच्या दिशेने वाटचाल ही या काळातील त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये. त्यांची प्रातिनिधिक प्रसादचिन्हे ‘चिद्घोष’मध्ये दिसतील. आज जवळजवळ चार दशकांनंतरसुद्धा या कथांची टवटवी कार्यम राहिल्याचे लक्षात येईल. कथा, कादंबरी, समीक्षा इत्यादी क्षेत्रांत गेल्या अर्धशतकापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या ‘चिद्घोष’ या कथासंग्रहास 1966 सालच्या सर्वोत्कृष्ट सहा पुस्तकांस देण्यात आलेल्या ‘ललित’ पारितोषिकांपैकी एक पारितोषिक मिळाले होते.