-
Pimpalpan 7 ( पिंपळपान -भाग ७ )
Anuradha Gurav/ Asha Parchure/ Shripad Kale/ Dnyaneshwar Nadkarni/ Yashwant Karnik/ G.Va.Behere/ D.S.Kakdeआशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Picasso (पिकासो)
पिकासोचे कलाजीवन जितके रोमहर्षक तितकेच त्याचे प्रेमजीवनही चित्तथरारक ! फर्नान्द ऑलिव्हिए आणि फ्रान्स्वाज गिय्यो यांच्यासारख्या त्याच्या प्रेयसींनी त्याच्याबरोबर व्यतीत केलेल्या दिवसांच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या लिहून ठेवलेल्या आहेत. जाकेलीन रॉकसारख्या सहधर्मचारिणीने पिकासोच्या उतारवयात त्याची नेकीने साथ केली. ज्या दिलदारपणाने आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला त्याच नेकीने त्याने शिल्पकला, मुद्राचित्रे आणि मातीकाम या कलांना आपले सर्वस्व वाहिले. विसाव्या शतकाच्या कलेच्या इतिहासात पिकासो एखाद्या उत्तुंग खडकासारखा उभा आहे. नव्वदपेक्षा जास्त वर्षे कार्यक्षम राहिलेल्या या अलौकिक कलावंताच्या जीवनाचे आणि प्रतिभेचे रहस्य शोधून काढण्याचा हा एक सच्चा प्रयत्न आहे.
-
Chidgosh (चिदघोष)
नवकथा ज्या काळात बहराला येत होती, त्या काळात, म्हणजे 1949 साली, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी ‘सत्यकथे’सारख्या दर्जेदार मासिकात आपल्या कथालेखनाला सुरुवात केली. ‘चिद्घोष’पासून ‘प्रस्थान’ पर्यंत या कथालेखनात कधी खंड पडला नाही. अनुभूतीची खोली व विविधता, तंत्राचा जागरूक शोध आणि दीघकर्थेच्या दिशेने वाटचाल ही या काळातील त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये. त्यांची प्रातिनिधिक प्रसादचिन्हे ‘चिद्घोष’मध्ये दिसतील. आज जवळजवळ चार दशकांनंतरसुद्धा या कथांची टवटवी कार्यम राहिल्याचे लक्षात येईल. कथा, कादंबरी, समीक्षा इत्यादी क्षेत्रांत गेल्या अर्धशतकापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या ‘चिद्घोष’ या कथासंग्रहास 1966 सालच्या सर्वोत्कृष्ट सहा पुस्तकांस देण्यात आलेल्या ‘ललित’ पारितोषिकांपैकी एक पारितोषिक मिळाले होते.