Picasso (पिकासो)
पिकासोचे कलाजीवन जितके रोमहर्षक तितकेच त्याचे प्रेमजीवनही चित्तथरारक ! फर्नान्द ऑलिव्हिए आणि फ्रान्स्वाज गिय्यो यांच्यासारख्या त्याच्या प्रेयसींनी त्याच्याबरोबर व्यतीत केलेल्या दिवसांच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या लिहून ठेवलेल्या आहेत. जाकेलीन रॉकसारख्या सहधर्मचारिणीने पिकासोच्या उतारवयात त्याची नेकीने साथ केली. ज्या दिलदारपणाने आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला त्याच नेकीने त्याने शिल्पकला, मुद्राचित्रे आणि मातीकाम या कलांना आपले सर्वस्व वाहिले. विसाव्या शतकाच्या कलेच्या इतिहासात पिकासो एखाद्या उत्तुंग खडकासारखा उभा आहे. नव्वदपेक्षा जास्त वर्षे कार्यक्षम राहिलेल्या या अलौकिक कलावंताच्या जीवनाचे आणि प्रतिभेचे रहस्य शोधून काढण्याचा हा एक सच्चा प्रयत्न आहे.