-
Madhu Mangesh Karnik: Vyaktimattva Aani Vangmain K
मधु मंगेश कर्णिक हे मराठीतील एक सव्यसाची साहित्यिक आहेत. गेल्या पन्नास वर्षांत सहाशेहून अधिक कथा, ‘देवकी’, ‘माहीमची खाडी’, ‘भाकरी आणि ङ्गूल’, ‘सनद’, ‘जुईली’, ‘वारूळ’, ‘संधिकाल’ इत्यादी दहा कादंबर्या, आठ ललित लेखसंग्रह, तीन व्यक्तिचित्रसंग्रह इत्यादी विविधांगी साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. तीन नाटक, बालसाहित्य, कविता, संपादने अशाही स्वरूपाच्या निर्मितीचा समावेश होतो. ‘जैतापूरची बत्ती’ हे त्यांचे अगदी अलीकडचे पुस्तक त्यांच्या कोकणप्रेमातून निर्माण झाले आहे. त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व हे कोकण या जन्मभूमीशी तसेच मुंबई या महानगरीशी अंतर्बाह्य स्वरूपात संबंधित आहे. नवनव्या विषयांचा कुतूहलपूर्ण वेध घेणारे, बहुविध जीवनानुभवांचे सहानुभूतिपूर्ण चित्रण करणारे, मानवतावादी भूमिकेतून दु:खाशी सहकंप पावणारी साहित्यनिर्मिती करणारे, भावनांना आवाहन करणारे तरीही विचारांना प्रेरणा देणारे, माणसाच्या अध:पतनाचा आणि सामाजिक-सांस्कृतिक मूल्यर्हासाचा आलेख रेखाटणारे, सुगम, आवाहक साहित्यनिर्मिती करणारे लेखक म्हणून मधु मंगेश कर्णिकांचे मराठी साहित्यातील स्थान अढळ आहे. मधु मंगेश कर्णिक : व्यक्तिमत्त्व आणि वाङ्मयीन कर्तृत्व या ग्रंथात डॉ. महेश खरात यांनी कर्णिक यांच्या समग्र वाङ्मयाचा सूक्ष्म वेध घेतला आहे. कर्णिकांच्या लेखनाचे बहुविध विशेष या ग्रंथामधून त्यांनी सप्रमाण विशद केले आहेत. त्यामुळे मधु मंगेशांच्या व्यक्तिमत्त्वावर व कार्यकर्तृत्वावर चांगला प्रकाश पडला आहे. गेवराई येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या र. भ. अट्टल महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहात असलेल्या डॉ. महेश खरात यांच्या प्रस्तुत ग्रंथामुळे कर्णिकांविषयीच्या साहित्यसमीक्षेत मोलाची भर पडली आहे. -विलास खोले
-
Jaitapurchi Batti (जैतापूरची बत्ती)
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाची चर्चा, चिकित्सा करणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे; साहित्यिक फक्त वातानुकूल दालनात बसून सुखेनैव रंजक लेखन करतात, आजूबाजूच्या समाजाच्या सुखदु:खाशी ते संबंध ठेवत नाहीत, असे म्हणणार्यांना उत्तर म्हणून हे पुस्तक लिहिलेले नाही. एका भूमिपुत्र लेखकाने सामाजिक कर्तव्य म्हणून हे पुस्तक लिहिलेले आहे. माझी अणुऊर्जेच्या दुष्परिणामांबाबतची, विशेषत: जैतापूर प्रकल्पाबाबतची भीती नाहीशी होत गेली. माझे कोकण, माझा देश यांना या प्रकल्पापासून कोणतीही भीती नाही, याबद्दल माझी खात्री पटली. आणि आपोआपच माझ्या लेखनातून, प्रतिपादनातून प्रकल्पाच्या समर्थनाचा अंत:प्रवाह झिरपू लागला. अर्थात या अणुऊर्जेची घातक बाजू माझ्या ध्यानात आल्याशिवाय कशी राहील? किंचितही निष्काळजीपणा, बेपर्वाई ही ऊर्जा हाताळताना, अणुभट्टीचे डिझाइन करताना झाल्यास अपरिमित जीवितहानी, आर्थिक हानी झाल्याशिवाय राहणार नाही, हेही मला कळून चुकलेले आहे. पण हे सारे मानवनिर्मित आहे. माणसानेच, वैज्ञानिकांनीच या समस्येची सोडवणूक करावयाची आहे. अणुभट्टय़ांची पराकोटीची सुरक्षितता हा यापुढील काळात वैज्ञानिकांसाठी परवलीचा शब्द ठरणार आहे. भारतीय वैज्ञानिक इथे कुठेही कमी पडणार नाहीत, याचीही माझी खात्री पटलेली आहे. पण अणुऊर्जेला पर्याय नाही, हेही खरे आहे. माडबन-जैतापूरचे दीपगृह (लाइटहाऊस) ‘जैतापूरची बत्ती’ म्हणून ओळखले जाते. या बत्तीने आजवर समुद्रातील जहाजांना मार्गदर्शन केले. आता तिने भूपृष्ठावरील मानवी जहाजांना, त्यांच्या कप्तानांना सुयोग्य मार्गदर्शन करावे अशी माझी अपेक्षा आहे-त्यासाठीच ही ‘जैतापूरची बत्ती’.
-
Lagebandhe (लागेबांधे)
अजाणत्या वयात जवळच्या नातेसंबंधातील व्यक्तींनी केलेल्या मानसिक-भावनिक पोषणाचे संस्कार आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करणारे ठरतात. दारिद्यातही मनाची श्रीमंती जपणार्या काही व्यक्ती मधु मंगेश कर्णिक यांच्या आयुष्यात आल्या. त्यांच्याशी असलेले `लागेबांधे’ या पुस्तकातून हळूवारपणे व्यक्त झाले आहेत. आयुष्यभर पुरेल अशा अगणित कडूगोड आठवणींची शिदोरी देणार्या मंगेशदादा, आतेबाय, होनीआजी, वारणामावशी, अनू, प्रेमा यांसारख्या सुहृदांविषयी केलेले आत्मीय लेखन.
-
Sobat.... (सोबत)
कवितेचे लेणे हृदयामध्ये घेऊन जन्मलेला लेखक नकळत गद्यातही कविता लिहू लागतो. मधु मंगेश कर्णिक हे असे एक काव्यात्म गद्य लिहिणारे लेखक आहेत. अनेक वर्षापूर्वी, `सत्यकथे’मध्ये `चेहरा असलेली झाडे’ या शीर्षकाने त्यांचे काही अगदी वेगळे लेखन प्रसिद्ध झाले; आणि त्याने साहित्य रसिकांचे लक्ष वेधून घेतले. आजूबाजूच्या, नेहमी दिसणार्या झाडापेडांवर कर्णिकांनी मोठ्या काव्यात्मतेने लिहिले होते. कर्णिकांनी ज्या नजरेने वृक्षवल्लरींना, प्राणिजगताला, निसर्गाला न्याहाळले, त्या नजरेत अजाण बालकाचे कुतूहल, जाणत्याची जिज्ञासा, कलाकाराची संवेदना, रसिकाची तन्मयता आणि कवीची सहृदयता होती. आज जवळ जवळ चार दशकांनंतरही `सोबत’मधील लेखन त्या वेळेएवढेच ताजे, टवटवीत आढळते, हा मधु मंगेश कर्णिकांच्या अमोघ लेखणीचा महिमा होय.
-
Karulcha Mulga (करुळचा मुलगा)
'करूळचा मुलगा' ही दारिद्य्राशी झगडत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आशावादी वृत्तीने केवळ लेखनगुणांच्या बळावर जिद्दीने स्वत:चे जीवन यशस्वी करणाऱ्या लेखकाने सांगितलेली जीवनकथा आहे. एका अर्थाने हे मधु मंग[...]