Gondan (गोंदण)
माणसामाणसांतले तुटलेले संबंध, परस्परांशी जवळीक साधण्यात त्यांना येणारे अपयश हा शान्ताबाईंच्याचिरंतन कुतूहलाचा विषय आहे. नजरेत भरलेले एखादे दृश्य, मनात रेंगाळणारे संदर्भ, निसर्गाची विशिष्ट रुपकळा, अबोध मनातली खोल गूढ चाळवाचाळव ह्याने शान्ताबाईंच्या मनात काव्य आकार घेऊ लागायचे त्याचा प्रत्यय यावा असा हा काव्यसंग्रह आहे. मात्र "शब्दांनीच परस्परांना भिडू बघतो आपण, लढू बघतो आपण" म्हणणर्यांना शान्ताबाईंना त्याची जाणीव आहे की, "शब्दांना शब्द भेटतीलच असे नाही-शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही". ठराविक वृत्तांबरोबरच त्यातून बाहेरही पडलेले शान्ताबाईंचे काव्य येथे वाचायला मिळते. शार्दूलविक्रीडितात लिहिलेली, पण आशयातील नावीन्य प्रकट करणारी अनेक सुनीते हेही ह्या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.