Drakshakanya (द्राक्षकन्या)
द्राक्षकन्या या इथे तरुतळी एक वही कवितेची, भाकरी एक, अन सुरई एक सुरेची, आणखी एक तू जवळ गात या विजानीं अन हें न रान मग, नंदनवन तं हेची! अनुवाद या निर्जन रानात इथे या झाडाखली मी, माझ्या जवळ एक भाकरी, कवितांची एक वही आणि मद्य भरलेली एक सुरई आहे. इथे माझ्या जवळ बसून तू गात आहेस. आता हे रान, रान राहिले नसून स्वर्गातले नंदनवन म्हणतात ते माझ्यासाठी हेच आहे.