Vadal Mansalatay (वादळ माणसाळतय)

By (author) Vasant Kanetkar Publisher Popular Prakashan

" श्री बाबा आमटे यांच्यासारखे महान झंझावती व्यक्तिमहत्व आणि श्री वसन्तराव कानेटकरांसारखे आजचे अग्रगण्य, प्रतिभाशाली नाटककार, या माणिकांचन योगातून ही नाटयकृती जन्माला आली आहे. सूर्याचे किरण शोधणारा, टिपणारा आणि त्यावर निर्वाह करणारा एक पक्षी ग्रीकपुराणात आहे. त्या पक्षाप्रमाणे वसन्तरावांच्या प्रतिभेनेही आज सर्वत्र कोंदटलेल्या काळोखातील प्रकाशकिरण टिपले आहेत, आणि त्यातून एक संस्मरणीय कलाकृती मराठी रंगभूमीला सादर केली आहे. अनुईच्या बेकेटप्रमाणे बाबांनाही आपले पूर्वीचे साहसी, स्वच्छंदी आणि विलासी जीवन, खांद्यावरील उत्तरीय फेकून द्यावे इतक्या सहजतेने फेकून दिले आणि कुठलेही तडजोड न मानणा-या एका ध्येयधुंद, संन्यस्त जीवनाचा सर्वस्वाने स्वीकार केला. एका किळसवाण्या कुष्टरोग्यला पाहून आपण घाबरलो, याची ती जळजळीत प्रतिक्रिया होती. हे नाटक चरित्रामक नाही; पण चरित्रावरून स्फुरलेले आहे बाबांच्या कर्तृत्वचा समुद्र तीन अंकात आणि तीन तासांच्या प्रयोगात बंदिस्त करणे प्राय: अशक्यच. ती लेखीकाची प्रतिज्ञाच नाही ; कधी नसतेही. वास्तवातील घटना आणि माणसे लेखकाच्या मनात उतरतात, राहतात, रुजतात आणि त्याच्या प्रतिभेने दिलेली नवीन रूपे, नवीन अस्तिव घेऊन प्रगट होतात. भाई म्हणजे पूर्णत: बाबा नव्हेत. फुलांचे जे अत्तराशी जे नाते असते, ते बाबांचे भाईशी आहे. मूलभूत नीती प्रस्थापित करू पहाणारयां प्रस्थापित नीतीचा विरोध नेहमीच सहन करावा लागतो. प्रस्थापित नीतीच्या (म्हणजे अनीतीच्या) पहारेकरयांशी झुंज देतच जगातल्या सर्व बाबांना आणि भाईना आपला मार्ग काढावा लागतो. वसन्तरावांचा 'भाई ' म्हणजे एक साशात वादळ आहे राघूशेटसारख्या जबरदस्ताला शरण आणणारे आणि शिवरामदादासारख्या सत्तांधांना अगतिक करणारे हे वादळ मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण करील, असंख्य प्रेक्षकांना आणि वाचकांना झपाटून टाकील आणि मानवी जीवनाचा सुभग अर्थ त्यांचाकडे पोचता करील असा मला विश्वास वाटतो."

Book Details

ADD TO BAG