-
Kadhitari Kothetari (कधीतरी कोठेतरी)
संगीताच्या जादूने भरलेले अद्भुतरम्य वातावरण, अप्रतिम गाणारी एक षोडशवर्षे'गानभरि' तरुणी आणि गायानिकालेवर लुब्ध असलेला एक सुसंकृत नागर तरुण………प्रेमाच्या ठराविक त्रीकोणाहून निराळा असलेला हा त्रिकोण जगाच्या पाठीवर कुठेही, केव्हाही एक निराळीच समस्या उभी करू शकतो - त्यात भर पुन्हा जादूच्या शंखाच्या प्रतापाची! संगीत, तारुण्य थोडीशी ' फनन्टासी' आणि कल्पनारम्यता, प्रेम आणि कलह किव्हा विरोध या सर्व घटकांच्या मिश्रणातून सिद्ध झालेले हे रसायन कुठलाही संदेश वैगेरे देण्याच्या भानगडीत न पडता सहजपने एक सार्वकालिक सत्य सांगून जाते. त्याला एक स्थालकालातीतातेचा, कल्पनारम्यतेचा स्पर्श आहे आणि रुचिर मनोरंजन हाच या नाटकाचा आत्मा आहे. पकिस्तानी टोळीवाल्या गायिकेच्या रेश्माच्या-कथेवरून स्फुरलेले वसंत कानेटकरांचे हे नवीन नाटक मोहक शब्दकळेने नटलेले, रसिकांना भावे असे!
-
Vadal Mansalatay (वादळ माणसाळतय)
" श्री बाबा आमटे यांच्यासारखे महान झंझावती व्यक्तिमहत्व आणि श्री वसन्तराव कानेटकरांसारखे आजचे अग्रगण्य, प्रतिभाशाली नाटककार, या माणिकांचन योगातून ही नाटयकृती जन्माला आली आहे. सूर्याचे किरण शोधणारा, टिपणारा आणि त्यावर निर्वाह करणारा एक पक्षी ग्रीकपुराणात आहे. त्या पक्षाप्रमाणे वसन्तरावांच्या प्रतिभेनेही आज सर्वत्र कोंदटलेल्या काळोखातील प्रकाशकिरण टिपले आहेत, आणि त्यातून एक संस्मरणीय कलाकृती मराठी रंगभूमीला सादर केली आहे. अनुईच्या बेकेटप्रमाणे बाबांनाही आपले पूर्वीचे साहसी, स्वच्छंदी आणि विलासी जीवन, खांद्यावरील उत्तरीय फेकून द्यावे इतक्या सहजतेने फेकून दिले आणि कुठलेही तडजोड न मानणा-या एका ध्येयधुंद, संन्यस्त जीवनाचा सर्वस्वाने स्वीकार केला. एका किळसवाण्या कुष्टरोग्यला पाहून आपण घाबरलो, याची ती जळजळीत प्रतिक्रिया होती. हे नाटक चरित्रामक नाही; पण चरित्रावरून स्फुरलेले आहे बाबांच्या कर्तृत्वचा समुद्र तीन अंकात आणि तीन तासांच्या प्रयोगात बंदिस्त करणे प्राय: अशक्यच. ती लेखीकाची प्रतिज्ञाच नाही ; कधी नसतेही. वास्तवातील घटना आणि माणसे लेखकाच्या मनात उतरतात, राहतात, रुजतात आणि त्याच्या प्रतिभेने दिलेली नवीन रूपे, नवीन अस्तिव घेऊन प्रगट होतात. भाई म्हणजे पूर्णत: बाबा नव्हेत. फुलांचे जे अत्तराशी जे नाते असते, ते बाबांचे भाईशी आहे. मूलभूत नीती प्रस्थापित करू पहाणारयां प्रस्थापित नीतीचा विरोध नेहमीच सहन करावा लागतो. प्रस्थापित नीतीच्या (म्हणजे अनीतीच्या) पहारेकरयांशी झुंज देतच जगातल्या सर्व बाबांना आणि भाईना आपला मार्ग काढावा लागतो. वसन्तरावांचा 'भाई ' म्हणजे एक साशात वादळ आहे राघूशेटसारख्या जबरदस्ताला शरण आणणारे आणि शिवरामदादासारख्या सत्तांधांना अगतिक करणारे हे वादळ मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण करील, असंख्य प्रेक्षकांना आणि वाचकांना झपाटून टाकील आणि मानवी जीवनाचा सुभग अर्थ त्यांचाकडे पोचता करील असा मला विश्वास वाटतो."
-
Himalayachi Savali (हिमालयाची सावली)
या नव्या नाटकात तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातला हे फार बरे झाले. वाईट आणि चांगले यांच्या संघर्षा पेक्षा चांगले आणि अधिक चांगले यांचा संघर्ष अधिक नाजूक असतो. तो रंगविणे ही कठीण असते. पण मराठी कथा, नाटक, कादंबरी यांनी आता या वाटा चोखाळल्या पाहिजेत. असे नाटक आपोआपच उत्कट स्वभावनिष्ठ होते. त्यामुळे नाट्याचा कृतीमपणा कमी होतो. ड्रिंकवॉटर, शेरवूड वैगेरेंच्या लिंकनवरल्या नाटकाचा हा अनुभव मी घेतला आहे. या नाटकात अनुषागाने सुचलेला एक विचार मी तुमच्या पुढे मांडतो, चरित्रात्मक नाट्य किव्हा कादंबरी लिहिणे हे एक प्रकारची कसरत अहे. मूळचि माणसे घेतली कि काल्पिताला, रचना कौशल्याला आणि संस्कार सामर्थ्याला मर्यादा पडतात. तुम्ही नावे, माणसांची नाती, व्यवसाय इत्यादी गोष्टी बदलल्या आहेत तरी तेवढ्याने फार मोठा बदल घडून येत नाही. मुळच्या माणसांच्या संबंधितांच्या हळव्या भवनांना अकारण जपावे लागते. अशा वेळी ज्या चरित्रा पासून आपल्याला आशयसंपन्न विषय मिळत असेल त्याचा आत्मा तेवढा कायम ठेवून बाकीचे सारे मूळ चरित्रापासून दूर नेणे अधिक हितकारक होणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर काहीही असो. वृद्ध नायक व नायिका यांच्याभोवति गुंफलेली कथानके आपल्याकडे फार थोडी असतात त्या दृष्टीने तुमचे नाटक एक नवीन पायंडा घालीत आहे. रामचंद्राची सीता आणि तुकारामाची जिजाई यांचे मिश्रण असलेली नायिका सुदैवाने तुम्हाला लाभलेली आहे. तिचे चित्रण तुम्ही फार कैशाल्याने केले आहे . वि. स. खांडेकर