Amelia Earhart (अमिलिया एयरहार्ट)

By (author) Kirti Parchure Publisher kanak book

अग्रेसर महिला पायलट अमिलिया एयरहार्टची विलक्षण कथा!-'अटलांटिक समुद्रावरून विमान चालवणारी पहिली महिला पायलट' असा मान मिळविण्यासाठी अमिलिया निघाली होती. संपूर्ण सफरीतला प्रत्येक क्षण तिच्या धैर्याची कसोटी पाहणारा होता. पहिल्या काही तासांनंतरच विमानाच्या पंख्यावर ठेवलेल्या इंधनाने पेट घेतला. तितक्यात विमानासमोर अचानक ढग जमा झाले आणि काचांवर बर्फाचा थर साचला. त्यानंतर विमान प्रचंड वेगाने स्वतः भोवतीच गरागरा फिरू लागलं आणि कुठल्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीला येऊन ठेपलं... शंभर वर्षांपूर्वी अमेरिकेत जन्मलेल्या अमिलिया एयरहार्टला आकाशाला गवसणी घालण्याचं प्रचंड वेड होतं. या वेडापायी तिने अचाट धाडसं आणि अनेक विक्रम केले. एव्हिएशन क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं म्हणून ती अखेरपर्यंत झटत राहिली आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर अजरामर झाली.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category