Adhunik Rashtravadache Udgate: Samarth Ramdas (आधु
समर्थ रामदासांच्या 'महाराष्ट्र देशा' ची चर्चा गेल्या दीडशे वर्षात न्यायमूर्ती रानडे यांच्यापासून एस. के. कुलकर्णीपर्यंत अनेक विचारवंतानी हिरिरीने केली आहे. परंतु समर्थांच्या राष्ट्रवादाची व्यापक सर्वांगीण चिकित्सा आजवर फारशी झालेली नाही. ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार रविकिरण साने यांनी हा परामर्श या ग्रंथात अत्यंत समर्थपणे घेतला आहे. केवळ समर्थांच्या राष्ट्रवादाचा विचार न करता साने यांनी या ग्रंथात एक नवा सिद्धांत मांडला आहे. युरोपीय राष्ट्रवादाच्या उदयात अंधारयुग, पुनरुज्जीवन, प्रोटेस्टंट चळवळ हा ऐतिहासिक घटनाक्रम महत्वाचा आहे. असाच घटनाक्रम त्याच काळात भारतात, विशेषतः महाराष्ट्रात घडला. त्याचा परिणाम म्हणून समर्थ रामदासांनी आधुनिक राष्ट्रवाद अत्यंत प्रगल्भपणे मांडला असे साने यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. युरोपातील ज्युडिया, हेलेस संस्कृतीची राष्ट्रवाद विषयक पार्श्वभूमी आणि भारतातील वैदिक राष्ट्रवादापासूनचा प्रवास त्यांनी नेमकेपणाने मांडला आहे. समर्थ विचारवंतांची चिकित्सा करताना त्या काळातील पाश्चात्य विचारवंत कसा विचार करीत hote हे हि दाखवून दिले आहे. सामाजिक व राष्ट्रीय विचारवंत, ऐतिहासिक धर्मसुधारक, समाजकंटक, पुरोगामी, समतावादी, निखळ बुद्धिवादी विचारवंत हे समर्थांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांनी ठळकपणे समोर आणले आहेत. समर्थ साहित्य आणि कर्तुत्व याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा हा ग्रंथ आहे.