-
Dr. Babasaheb Ambedkaranna Anuyayankadun Apeksha (
आपल्या मानाकरिता व पुढारी होण्याकरिता फार हापापले लोक आहेत. फाइलीत किवा कागदात पुढारीपण नसते. वर्तमानपत्रात नाव आल्याने माणूस पुढारी होत नसतो. खरे काम करा, आपल्या हक्काकरिता बलिदान करा. गर्व्हनरला पुढाऱ्याची भीती वाटली पाहिजे. पुधाऱ्याचे ऐकले नाही तरीही ज्या समाजाचा पुढारी आहे तो समाज आपल्याचा डोक्यावर जोडे मारील हि धास्ती गर्व्हनरला (शासनकर्त्यांना) वाटली पाहिजे याला म्हणतात 'सच्चा पुढारी'....
-
Adhunik Rashtravadache Udgate: Samarth Ramdas (आधु
समर्थ रामदासांच्या 'महाराष्ट्र देशा' ची चर्चा गेल्या दीडशे वर्षात न्यायमूर्ती रानडे यांच्यापासून एस. के. कुलकर्णीपर्यंत अनेक विचारवंतानी हिरिरीने केली आहे. परंतु समर्थांच्या राष्ट्रवादाची व्यापक सर्वांगीण चिकित्सा आजवर फारशी झालेली नाही. ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार रविकिरण साने यांनी हा परामर्श या ग्रंथात अत्यंत समर्थपणे घेतला आहे. केवळ समर्थांच्या राष्ट्रवादाचा विचार न करता साने यांनी या ग्रंथात एक नवा सिद्धांत मांडला आहे. युरोपीय राष्ट्रवादाच्या उदयात अंधारयुग, पुनरुज्जीवन, प्रोटेस्टंट चळवळ हा ऐतिहासिक घटनाक्रम महत्वाचा आहे. असाच घटनाक्रम त्याच काळात भारतात, विशेषतः महाराष्ट्रात घडला. त्याचा परिणाम म्हणून समर्थ रामदासांनी आधुनिक राष्ट्रवाद अत्यंत प्रगल्भपणे मांडला असे साने यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. युरोपातील ज्युडिया, हेलेस संस्कृतीची राष्ट्रवाद विषयक पार्श्वभूमी आणि भारतातील वैदिक राष्ट्रवादापासूनचा प्रवास त्यांनी नेमकेपणाने मांडला आहे. समर्थ विचारवंतांची चिकित्सा करताना त्या काळातील पाश्चात्य विचारवंत कसा विचार करीत hote हे हि दाखवून दिले आहे. सामाजिक व राष्ट्रीय विचारवंत, ऐतिहासिक धर्मसुधारक, समाजकंटक, पुरोगामी, समतावादी, निखळ बुद्धिवादी विचारवंत हे समर्थांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांनी ठळकपणे समोर आणले आहेत. समर्थ साहित्य आणि कर्तुत्व याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा हा ग्रंथ आहे.
-
Maratha Samaj Apeksha Ani Upeksha (मराठा समाज अपेक
मराठा समाजात औदार्य, सहिष्णुता,धैर्य,बंधुभाव व सोशिकता हे गुण ठासून भरलेले आहेत. त्यामुळेच तो वडील भावाच्या भूमिकेतून इतरांना काही मिळते म्हणून कधीही खंत करत नाही. सर्वांना दिल्यानंतर आपणास मिळावे हि भावना ठेवतो. सर्वांच्या हितातच स्वतःचे हित पाहतो. सर्वांना जेवल्यानंतर तो स्वतःच्या भुकेचा विचार करतो व दुसरयाची भूक भागल्या नंतर स्वतः तृप्तीचा ढेकर देतो. सांप्रतच्या स्थितीत अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात अडकलेल्या या भावाला इतर सर्वांनी मोठ्या मनाने औदार्याचा हात देऊन त्यांच्याबरोबर चालण्याची संधी देतो. यातूनच बहुजन समाजात अभिसरणाची मंदावलेली प्रक्रिया गती व समाजासमाजातील आप-पर भाव निघून जाईल. समाज हिताची तळमळ असणारे व समाजासाठी आयुष्य वेचणारे एखादे तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा समाजात जन्मास यावेत व मराठेतर बहुजन समाजात सर्वहारा समाजाची तळमळ असणारे एखादे श्रीमंत राजर्षि शाहू महाराज जन्मास यावेत. तरच मराठा - मराठेतर बहुजनांना न्याय मिळेल व ते गुण्यागोविंदाने राहतील.
-
Lok Sanskruticha Gabhara (लोक संस्कृतीचा गाभारा)
डॉ. राजेंद्र माने यांच्या या पुस्तकातून लोकसंस्कृतीचे अतिशय सशक्त, सर्वसमावेशक आणि जिज्ञासापूर्ती करणारे लेखन केलेले आहे. लोकसंस्कृती विषयीची उदासीनता, आपल्या संस्कृतीविषयी असणारी तुटलेपणाची भावना,लोकमानस आणि त्यांची जीवनशैली याविषयी असणारे आमचे अज्ञान दूर करण्याचे कार्य अशा ग्रंथामुळेच होऊ शकते. हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी या ग्रंथातून आपल्या लोकसंस्कृतीचे जे दर्शन घडवले आहे, ते वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल.