Ganak-Yantra-Manav Dattatray Kaprekar (गणक-यंत्र-म
आयुष्याची ६०-६५ वर्षे गणित या विषयाला वाहून घेतलेले कै. दत्तात्रय कापरेकर यांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन या पुस्तकातून घडतं. मात्र, हे नेहमीपेक्षा वेगळं चरित्र आहे.कापरेकर यांनी सांगितलेल्या गणित संज्ञा, आकड्यांची उकल, नव्या गणिती पद्धती, आदींचे संमेलनच, दिलीप गोटखिंडीकर यांनी भेटीला आणलं आहे. कारेकर स्थिरांक, स्वयंभू संख्या आणि संगम संख्या, जलद आकडेमोडीच्या तेरा युक्त्या, काही गमतीदार संख्या,आवर्ती दशांश अपूर्णांक संख्यांची चक्रे, चौरस, ठोकळे आणि काही आकडेमोडी अशा प्रकरणांतून गणिताचं आगळंवेगळं जग समोर उभं राहतं. हर्षद संख्या, दत्तात्रय संख्या, विजय संख्या, मर्कट संख्या, द्विमुखी संख्या, हस्त लाघव संख्या, तिरप्या झेपेच्या संख्या, आंदोलन संख्या, विच्छेदनीय संख्या, रिक्त पद भरण संख्या असं आकड्यांचं मायाजाल भुरळ पाडतं.. १७ जानेवारी १९०५ साली डहाणू येथे जन्मलेले कापरेकर तसे आपल्या शालेय जीवनात फारसे चमकले नाहीत परंतू लहानपणापासून त्यांना संख्यांचे विशेष आकर्षण होते. सतत गणितातील जादू आपल्या शिक्षकांकडून समजून घेत, पुढे याच आकडे मोडीचे रुपांतर पुढे स्वतःच्या ओळखीत असे काही झाले की आजच्या आपल्या मोबाईल नंबर्सची १० अंकी संख्या हे त्यांच्याच कार्याचे फलित असून नोकिया या कंपनीने त्यांच्या कार्यालयात याविषयीची कृतज्ञतापूर्वक नोंद केली. यदाकदाचित कापरेकरांना जन्म पाश्चात्य देशात झाला असता तर त्यांचा अनेक अंगांनी बहुमान झाला असताच, शिवाय त्यांच्या नावे विद्यापीठात अध्यासाने निर्माण झाली असती.