Sanskrutik Punarjagranache Ardhvayu Kanhaiyyalal Munshi (सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैय्यालाल मुन्शी)

By (author) Prasad Phatak Publisher Bharatiya Vichar Sadhana

सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैय्यालाल मुन्शी लेखक: प्रसाद फाटक लेखक प्रसाद फाटक यांना भाविसातर्फे दिल्या गेलेल्या अभ्यासवृत्तीद्वारे कन्हैयालाल मुन्शींचा पत्रव्यवहार आणि वैयक्तिक नोंदी, त्यांनी संपादित केलेली नियतकालिके, अभिलेखागारातील कागदपत्रे, मुन्शींवर लिहिले गेलेले तसेच मुन्शींचे स्वत:चे साहित्य या सर्वांच्या अभ्यासामधून प्रस्तुत पुस्तक साकारले आहे. मुन्शींचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, ‘भारतीय विद्या भवन’च्या स्थापनेमागची भूमिका, संविधान सभेच्या कार्यातले योगदान, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणामध्ये बजावलेली भूमिका, हैदराबाद संस्थानामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला सरकारदरबारी फोडलेली वाचा, विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेमधला सहभाग अशा अनेक घटनांचा आणि त्या मागच्या कार्यकारणभावाचा मराठी साहित्यामध्ये प्रथमच विस्ताराने वेध घेतला जात आहे. या पुस्तकाच्या माध्यामतून एका निस्सीम लोकशाहीवादी आणि पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन व्यापक हिंदुहिताची भूमिका घेणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची जवळून ओळख वाचकांना होईल.

Book Details

ADD TO BAG