-
Asamanya Sahasveer (असामान्य साहसवीर)
परम मित्र पब्लिकेशन्स प्रकाशित नवीन पुस्तक "असामान्य साहस वीर लेखक: मिलिंद आमडेकर ... इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवणे ही सहसाचा ध्यास घेतलेल्यांची मूळ प्रवृत्ती असते. त्यासाठी कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करण्याची, त्याच्यासाठी कष्ट घेण्याची साहस वीरांची तयारी असते. रिचर्ड हॅलीबर्ट न सारखा साहस वीर, तर एफ जे दावर सारखा भारतीय सत्तर वर्षांपूर्वी सायकलने जगाचा स्वप्न पाहतो; आणि सायकलने उत्तर -दक्षिण असे तीन हजार किलोमीटरचे सहारा वाळवंट पार करणारा पहिला मानव ठरतो. या सर्वांचीच साहसं मनाचा ठाव घेणारी आहेत. म्हणूनच त्यांच्या सहसा विषयी माहिती करून घेण्यासाठी... "असामान्य साहस वीर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. #ज्ञानभाषा ,#असामान्य, #साहसवीर,#पुस्तक #वाचन #परम #मित्र #पब्लिकेशन्स #मराठीपुस्तक #साहस
-
Gatha Balidanachi (गाथा बलिदानाची)
गाथा बलिदानाची हा ग्रंथ म्हणजे स्वातंत्र्य युद्धात हुतात्म्यांच्या सांडलेल्या रक्ताने लिहिलेली गाथा आहे हा ग्रंथ वाचकांमध्ये राष्ट्रभिमान जागृत करेल आणि स्वातंत्र्य फुकट मिळालेले नाही याची जाणीव करून देईल पुढील अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभ असलेले हे पुस्तक आपल्या संग्रही नक्कीच असावे गाथा बलिदानाची क्रांतीच्या अग्नीकुंडातील धगधगत्या सत्याचा साक्षात्कारी दस्तऐवज लेखक डॉक्टर गिरीश पिंपळे
-
Vedh Ahilyabaincha (वेध अहिल्याबाईंचा)
परम मित्र पब्लिकेशन्स चे पुस्तक " वेध अहिल्याबाईंचा" लेखक डॉक्टर देवीदास पोटे. अहिल्याबाईं होळकर विश्वाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व आहे.ती एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ महाराणी होती. कर्मयोगिनी आणि राज्य योगिनी होती. आपले राज्य शिवार्पण केलेली शिवयोगीनी होती. प्रजा जनांची लोक माता होती. अहिल्याबाईंची कारकीर्द इतिहासाच्या पानांवरील एक तेजस्वी यशोगाथा आहे . अहिल्याबाई हे समर्पित कल्याणकारी राज्यकारभाराचे प्रतीक आहे. राजनीतीला समभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची जोड देऊन त्यांनी भारतीय परंपरेत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. अहिल्याबाईंच्या विविध अनोख्या गुणांचा आणि त्यांच्या विश्वात्मक विचारधारेतील विविध पैलूंचा अविष्कार या ग्रंथात आणि समर्थपणे मांडला आहे .अहिल्याबाई च्या कारकिर्दीतील इतिहासाची सोनेरी पाने म्हणजे त्यांच्या अनेकांगी कर्तृत्वाचा लखलखता आलेख आहे. पुण्यश्लोक आहिल्याबाई यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाचे आणि लोककल्याणकारी कार्याचे पैलू पुन्हा पुन्हा वाचावे , अभ्यासावे, स्मरणात ठेवावे आणि अनुसरावे असे आहेत. हा ग्रंथ आपल्या सर्वांना एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असा विश्वास आहे.
-
Ahilyabai samajun Ghetana (अहिल्याबाई समजून घेताना)
अहिल्याबाई हे मध्य भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व आहे. अहिल्याबाई म्हणजे कर्तृत्वाचे सोनेरी पान स्वातंत्र्य, समता, शांतता, सुरक्षितता, सौख्य, समृद्धी, न्याय अशा सर्व बाबतीत त्यांची प्रजा संतुष्ट होती. वर्तमान काळात सर्वत्र क्षेत्रात मानवी जीवन मूल्यांचे अतिशय वेगाने अवमूल्यन होत आहे. अशावेळी अहिल्याबाईंच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. अहिल्याबाईंचे "रयतेला सुखी ठेवणे" हे माझे कर्तव्य आहे ,हे समजून घेण्याच्या दिशेने केलेला हा चिंतन प्रवास. सर्वांनी आपल्या संग्रही ठेवावा असे हे पुस्तक:अहिल्याबाई समजून घेताना
-
साहसकन्या (Sahas Kanya)
हिमालय आणि काराकोरम पर्वत रांगेत १४ शिखर अशी आहेत जी २६ हजार फुटांवरून अधिक उंचीवर आहेत. वातावरणातला प्राणवायू निम्म्याहून कमी झालेला असतो.अशी जीवघेणी १४ शिखरं कृत्रिम प्राणवायू शिवाय सर करणं म्हणजे वेडेपणा.अशाच जिद्दीने साहस करणाऱ्यां साहसकन्या
-
Bhishma Nirwan (भीष्म निर्वाण)
खोल अभ्यासपूर्ण , आधुनिक खगोलशास्त्राच्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर महाभारत संहितेतील भीष्म निर्वाणाच्या संदर्भातील कालक्रम आणि खगोल शास्त्रीय पुरावे यांचे तपशीलवार विवेचन. भारतीय संस्कृती विषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे आणि संग्रही ठेवावे. #परम #मित्र, #भारतीय संस्कृती #खगोलशास्त्र,#महाभारत, #श्रीकृष्ण #भीष्म, #इतिहास,#अभिजातभाषा,# मराठी,#पुस्तक,#वाचन पाने १७२, आकार ९"* ६"
-
Devalay Ek Shodh Parikrama (देवालय एक शोध परिक्रमा)
देवालय एक शोध परिक्रमा" लेखिका :सुनीला सोवनी, प्रकाशक: परम मित्र पब्लिकेशन्स पृष्ठ संख्या २१६, हे #पुस्तक महान सांस्कृतिक वारसा मागची तळमळ, घेतलेले अविश्रांत अपार कष्ट, केलेली साधना आणि वैज्ञानिक पद्धतीने अद्वैतानुभव घेण्यासाठी उभारलेले असाधारण सिद्ध पीठ बुद्धीच्या आधाराने उकलावे यासाठी. देवालय म्हणजेच परमेश्वराचे घर साकारण्याची ती एक अशी प्रक्रिया आहे की ,ज्यायोगे परमेश्वरी शक्तीचे भक्तांमध्ये जागरण घडून येईल, भक्तांचे रूपांतर होऊन भगवंत आणि भक्त एकरूप होतील. परमेश्वरी कृपाप्रसादाने भक्तांचा भगवंत व्हावा, त्याचे परम कल्याण व्हावे यासाठी केलेला तो फार मोठा यत्न आहे. ब्रह्मशक्तीला सगुण रूपात साकारणाऱ्या विद्येची गाथा म्हणजेच देवालयाची शोध परिक्रमा आहे.
-
Yogache Vishwa-Vishwatla Yog (योगाचे विश्व- विश्वातला योग)
२१जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हायला लागून दहा वर्षे झाली. प्राचीन भारतीय ज्ञान, परंपरा , सौम्य संपदा म्हणून योग जगमान्य होत आहे. त्याचबरोबर काही आव्हाने सुद्धा आहेत. आज जगातला योग कसा आहे व योगाचे जग कसे असायला हवे याबद्दलचा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. योग हा व्यवसाय म्हणून बाजारपेठेच्या आधीन होणे ,अशा आव्हानांची चर्चा सुद्धा हे पुस्तक करते.. भारतासमोर उभ्या असलेल्या योग अपहरणाच्या धोक्याची स्पष्ट जाणीव सुद्धा या पुस्तकातून होते . वैश्विकरणाच्या युगात योगाचा आर्थिक, सांस्कृतिक , मुत्सद्देगिरी व सौम्य संपदा म्हणून वेध घेणारे मराठी मधले किंबहुना भारतातले हे पहिलेच पुस्तक आहे. म्हणून याचे विशेष महत्त्व. नक्की आपल्या संग्रही ठेवावे, वाचावे इतरांनाही वाचण्यासाठी प्रवृत्त करावे असे हे पुस्तक
-
Bharat Pakistan yudha -1965(भारत पाकिस्तान युद्ध -१९६५ )
1965 साली झालेलं भारत पाकिस्तान युद्ध इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तानने भारतीयांवर लागलेल्या अनेक युद्धांपैकी एक युद्ध होतं. या युद्धात आपल्या सेना दलाने अत्यंत पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान करून लष्करी विजय मिळवला. भारतीयांचं मनोबलही काही पटीने उंचावण्यास हातभार लागला हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या आदरणीय लाल बहादूर शास्त्रीजी आणि संरक्षण मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानी इस्लामिक स्टेट च्या सशस्त्र आक्रमणाला सशस्त्र प्रतिकाराने उत्तर देण्याचा निर्णय घेतला हेही उत्तमच झाले. त्याच 1965 च्या युद्धाची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. सर्वांच्या संग्रही असावे असे हे ५७६ पानी पुस्तक.
-
Swatachya Aatmyachya Shodhat Mahatma Gandhi (स्वतःच्या आत्म्याच्या शोधात महात्मा गांधी)
गांधीजींची पत्नी कस्तुरबा यांचं आयुष्य कसं गेलं. गांधीजी कडून त्यांना कशी वागणूक मिळत होती ...याचा शोध या पुस्तकात लेखकाने घेतल्याचे दिसून येते
-
Videshi Guptaher Katha (विदेशी गुप्तहेर कथा)
पंकज कालुवाला यांचे नाव विदेशी गुप्तहेर व त्यांच्या कारवाया त्यांनी त्यांच्या देशासाठी केलेली कामे या सगळ्यांचे सविस्तर दस्तावेजीकरण म्हणता येईल अशी त्यांनी पुस्तके लिहिली आहेत आणि या पुस्तकांशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्या या पाचही पुस्तकांतील कारवाया व त्यांची वर्णने ही पुराव्यानिशी यांनी केली आहेत या पुस्तकांच्या शेवटी मोठी संदर्भ सूची दिली आहे. आणि आता असे काही गुप्तहेर त्यांना आढळले की त्यांनी केलेल्या कारवायांचे पुरावे किंवा संदर्भ त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने काही गुप्तहेर कथा लिहिल्या आणि त्याच परममित्र पब्लिकेशन्स काल प्रकाशित केल्या ते पुस्तक म्हणजे पंकज कालुवाला लिखित विदेशी गुप्तहेर कथा. नावाप्रमाणेच वेगळ्यावेगळ्या विदेशी गुप्तहेर यांच्या या पुस्तकामध्ये दहा कथा आहेत त्यामध्ये वाचक गुंतून जातो.
-
Khisekapuchya Mishya Ani Anya Rahasyamayi Katha -
पंकज कालुवाला यांची दोन पुस्तके नव्याने आली आहे रहस्यमय कथा भाग एक आणि भाग दोन. पुस्तकाच्या प्रस्तावना मध्ये मनोगतामध्ये त्यांनी म्हटलंय की रहस्य कथा लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे वाचकाला वाचत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. खरोखरच आपण मी जेव्हा हे पुस्तक जेव्हा वाचतो त्यावेळेला आपल्या हे लक्षात येतं. रहस्य कथा मध्ये त्या कथेतील रहस्य कथेच्या शेवटी कुठेतरी उलगडतं . उदाहरणार्थ डुकरांचे खून या कथेमध्ये आपल्याला इतकं गुंतायला होतं की डुकरांचे खून कसं काय आणि आपण वाचत वाचत कथेच्या शेवटी येतो त्या वेळेला या सगळ्या रहस्याचा उलगडा होतो. आम्ही आणि अशाच प्रकारच्या कथा या पहिल्या भागात व दुसऱ्या विभागात आहेत पंकज कालुवाला यांची लेखन शैली लेखक वाचकांना फिरवून ठेवते याचा अनुभव आला . पंकज कालवाल्यांचे जे चाहते आहेत त्यांनाही निश्चितच येईल असं निश्चित वाटतं.
-
Dukaranche Khun Ani Anya Rahasyamayi Katha (डुकरां
पंकज कालुवाला यांची दोन पुस्तके नव्याने आली आहे रहस्यमय कथा भाग एक आणि भाग दोन. पुस्तकाच्या प्रस्तावना मध्ये मनोगतामध्ये त्यांनी म्हटलंय की रहस्य कथा लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे वाचकाला वाचत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. खरोखरच आपण मी जेव्हा हे पुस्तक जेव्हा वाचतो त्यावेळेला आपल्या हे लक्षात येतं. रहस्य कथा मध्ये त्या कथेतील रहस्य कथेच्या शेवटी कुठेतरी उलगडतं . उदाहरणार्थ डुकरांचे खून या कथेमध्ये आपल्याला इतकं गुंतायला होतं की डुकरांचे खून कसं काय आणि आपण वाचत वाचत कथेच्या शेवटी येतो त्या वेळेला या सगळ्या रहस्याचा उलगडा होतो. आम्ही आणि अशाच प्रकारच्या कथा या पहिल्या भागात व दुसऱ्या विभागात आहेत पंकज कालुवाला यांची लेखन शैली लेखक वाचकांना फिरवून ठेवते याचा अनुभव आला . पंकज कालवाल्यांचे जे चाहते आहेत त्यांनाही निश्चितच येईल असं निश्चित वाटतं.