-
Vedh Pavsacha Arthat Goshta Mansoonchi (वेध पावसाच
उकाड्यापासून सुटका, पाण्याच्या दुर्भिक्षापासून मुक्ती इत्यादींमुळे मान्सूनच्या पावसाचं स्वागत सुखकारकच. दरवर्षी दक्षिण आशिया विशेषतः भारत देश या पावसानं न्हाऊन निघतो. हिंदी महासागरापासून वाहणाऱ्या मोसमी वार्यांची परिणीती म्हणजे भारतामधील पावसाळा. त्यालाच आपण मान्सून म्हणतो. खरं तर मान्सून हि एक मोठी गुंतागुंतीची आणि अद्यापही संपूर्णपणे न उलगडलेली हवामान प्रणाली आहे.
-
Vidnyanini Bhag 2 (विज्ञानिनी भाग २)
विज्ञान प्रसारासाठी ,समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याकरिता विद्यान कथांचा उपयोग अधोरेखित झाला आहे. विज्ञान कथा हा स्वतंत्र कथा प्रकार म्हणूनही मान्यता पावला आहे.marathi विज्ञान परिषदेच्या मासिक विज्ञान पत्रिकेतील काही निवडक कथांचा हा संग्रह.
-
Shambhar Shodhkatha (शंभर शोधकथा)
१००० मैल व्यासाच्या आणि सुमारे २० कोटी चौरस मैल क्षेत्रफळ असणाऱ्या पृथ्वी गोलाला सहज एका तर्फेच्या सहाय्याने उलथून टाकण्याच्या गोष्टी करणाऱ्या आर्किमिडीज (इ.स.पू. २८७ ते २१२) , ते डॉलीचे क्लोनिंग करणाऱ्या निमूटपर्यंत आणि बायोमट्रिक्स, ह्यूमन जिनोम पर्यंतच्या मनुष्याचे जीवन बदलून टाकणाऱ्या संशोधकाच्या या काही निवडक शोधकथा.
-
Vidnyanadharit-Nisarg-Sanvardhan-Sanrakshan (विज्ञ
आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात 'संवर्धन-जीवशास्त्र म्हणजेच 'कॉन्झर्व्हेशन बायोलॉजी' हि एक स्वतंत्र, बहुआयामी तरीही इतर विज्ञानशाखा स्वतःबरोबर जोडणारी, अशी विद्याशाखा म्हणून उदयाला येण्यामागेही दोनअडीचशे वर्षांपूर्वीपासून लागत गेलेले शोध,त्यानं वाढत गेलेली मनुष्यजातीची (निदान शास्त्रीय पातळीवरची) जाणीव, महायुद्धांसारख्या काही घटना हे सगळं कारणीभूत आहे. हा एका विज्ञानाचा इतिहास आहे. त्यामुळे यात प्राचीन भारताची निसर्ग राखण्याची परंपरा इत्यादी असा कुठलाही भाग विचरत घेतलेला नाही. विज्ञानाची मुलतत्व, निसर्ग-संरक्षण-संवर्धन यात कसकशी शिरली आणि त्यामुळे आज हि विद्याशाखा म्हणून कशी प्रस्थापित झाली आहे, याचा हा आढावा.
-
Aarogyache Gupit (आरोग्याचे गुपित)
अवघ्या मनुष्याची धडपड असते ती सुखी जीवन जगण्याची,प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असली तरी सुखी जीवनाची प्राथमिक अट म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन. आरोग्यपूर्ण जगण्यासाठी फार मोठ्या ग्रंथ अभ्यासाची गरज नसून छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या व पाळल्या तर आपण सहजपणे आपले आयुष्य आरोग्यपूर्ण जगू शकू असा विश्वास निर्माण करणारी हि काही टिपणे...
-
Vidnyan-Shikshan-Gangotri Indian Institute Of Scie
"श्रेष्ठ प्रतीच्या ज्ञानाचे संपादन करायचे असेल तर गर्दी,गोंधळ आणि बाजारी गजबटापासून दूर आणि अलिप्त वातावरणाची नितांत गरज असते. याच कारणाने प्रचिउन मनीशी एकाकी पर्वतशिखरांवर किंवा घनदाट जंगलात तपःसाधना करण्यासाठी गेले आणि त्यांच्या तशा एकांतिक तपश्चर्येतून विशुद्ध,उमदे आणि विशाल असे मानवी जीवनविषयक दयन उदयाला आले. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स हे खरोखरच असे उत्तुंग एकांत शिखर आहे, जेथे गेल्या सात दशकांमध्ये वैज्ञानिक उत्कृष्टता बहरत गेली...!"
-
Ganak-Yantra-Manav Dattatray Kaprekar (गणक-यंत्र-म
आयुष्याची ६०-६५ वर्षे गणित या विषयाला वाहून घेतलेले कै. दत्तात्रय कापरेकर यांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन या पुस्तकातून घडतं. मात्र, हे नेहमीपेक्षा वेगळं चरित्र आहे.कापरेकर यांनी सांगितलेल्या गणित संज्ञा, आकड्यांची उकल, नव्या गणिती पद्धती, आदींचे संमेलनच, दिलीप गोटखिंडीकर यांनी भेटीला आणलं आहे. कारेकर स्थिरांक, स्वयंभू संख्या आणि संगम संख्या, जलद आकडेमोडीच्या तेरा युक्त्या, काही गमतीदार संख्या,आवर्ती दशांश अपूर्णांक संख्यांची चक्रे, चौरस, ठोकळे आणि काही आकडेमोडी अशा प्रकरणांतून गणिताचं आगळंवेगळं जग समोर उभं राहतं. हर्षद संख्या, दत्तात्रय संख्या, विजय संख्या, मर्कट संख्या, द्विमुखी संख्या, हस्त लाघव संख्या, तिरप्या झेपेच्या संख्या, आंदोलन संख्या, विच्छेदनीय संख्या, रिक्त पद भरण संख्या असं आकड्यांचं मायाजाल भुरळ पाडतं.. १७ जानेवारी १९०५ साली डहाणू येथे जन्मलेले कापरेकर तसे आपल्या शालेय जीवनात फारसे चमकले नाहीत परंतू लहानपणापासून त्यांना संख्यांचे विशेष आकर्षण होते. सतत गणितातील जादू आपल्या शिक्षकांकडून समजून घेत, पुढे याच आकडे मोडीचे रुपांतर पुढे स्वतःच्या ओळखीत असे काही झाले की आजच्या आपल्या मोबाईल नंबर्सची १० अंकी संख्या हे त्यांच्याच कार्याचे फलित असून नोकिया या कंपनीने त्यांच्या कार्यालयात याविषयीची कृतज्ञतापूर्वक नोंद केली. यदाकदाचित कापरेकरांना जन्म पाश्चात्य देशात झाला असता तर त्यांचा अनेक अंगांनी बहुमान झाला असताच, शिवाय त्यांच्या नावे विद्यापीठात अध्यासाने निर्माण झाली असती.
-
Dayri Apanga Jagrachi (डायरी अपंग जागराची)
डॉ. त्र्यंबक दुनबळे यांनी 'अली यावर जंग' या राष्ट्रीय श्रवण-विकलांग संस्थेत माध्यम अधिकारी म्हणून दोन दशकांपेक्षाही अधिक काळ व्यतीत केला. कामानिमित्तनं त्यांनी मणिपूरपासून अहमदाबादपर्यंत आणि जम्मूपासून चेन्नईपर्यंत देशभर प्रवास केला. त्यातून आलेल्या अनुभवांतून हे पुस्तक आकाराला आलं आहे. मात्र हे केवळ अनुभव नाहीत, हे संशोधनही आहे. शास्त्रीय माहिती आहे. कार्यकर्त्याच्या, संघटकाच्या भूमिकेतून पाहिलेली माणसे, अनुभव आहेत. हे सर्व येतं ते सोप्या, सुलभ भाषेत. अपंगत्व हे पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. अपंगत्वाचे प्रकार आणि व्याख्याही ते सांगतात. त्यांना आवश्यक असणाऱ्या साधनांची, तंत्रज्ञानाची माहितीही ते देतात. विशेषतः कर्णबधिरपणासंबंधी असं विवेचन क्वचितच वाचायला मिळतं.