-
Sattaritla Bharat (सत्तरीतला भारत)
स्वतंत्र भारताचा सखोल समीक्षात्मक आढावा.. देशाचा सत्तर वर्षांतला झंझावाती प्रवास... फाळणीपासून ते १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामांची छाप, लोकपाल विधेयक ते नोटाबंदीचे धोरण; या साऱ्या आठवणींचा लेखाजोखा यात समाविष्ट आहे. त्यातून भारत देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होते.
-
Anandayatri Dudhwala (आणन्दयात्री दूधवाला)
१९४९ मध्ये केरळचे वर्गिस कुरियन, हे अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेऊन गुजरातमध्ये स्थायिक झाले. आणि दुधाला स्पर्श न करणाऱ्या या अवलियाने तिथे दुग्धक्रांती घडवून आणली. त्या क्रांतीने वर्गिस कुरियन यांना 'भारताचा दुधवाला' ही उपाधी प्राप्त झाली. वर्गिस कुरियन यांनी आपले संपूर्ण आयुष्य गुजरातमध्ये घालवले. तिथल्या अशिक्षित शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांनी साऱ्या जगाला अक्षरशः दुध पाजले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांच्या अथक प्रयत्नांतून दुग्ध्याव्यावासायातील, 'बिलियन लिटर आयडिया' हा दुधाचा पूर आणणारा प्रकल्प ठरला. म्हणून त्यांना त्यांच्या या असामान्य कार्यासाठी विविध राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील मानसन्मान प्राप्त झाले. आज त्यांच्या हयातीनंतरही लोकांच्या हृदयात अमूल चा ब्र्यांड कायमचा कोरला गेला आहे. विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो यांनी असामान्य अशा वर्गिस कुरियन यांचा ललित शैलीने घेतलेला जीवनालेख तरुणांना नक्कीच स्फूर्तिदायक ठरेल !
-
Putra Chetkinicha (पुत्र चेटकिणीचा)
सतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही… वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या.त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या. या दोन्ही शक्तिंमधील संघर्षाला धार चढत होती, ती राजदरबारातील लहरी माणसांच्या काटकारस्थानांमुळे अशाच एका कारस्थानाच्या पार्श्वभूमीवरची ही कथा… केपलर नावाच्या एका महान संशोधकाच्या म्हाता-या आईला चेटकीण ठरवून जिवंत जाळायचा कट आखला गेला. या खटल्यातून आपल्या निष्पाप आईला कसं वाचवायचं, या विवंचनेनं ग्रासलेल्या केपलरना कोणत्या मानसिक ताणतणावातून जावं लागलं, याचं भावस्पर्शी चित्रण करणा-या मूळ जर्मन कादंबरीचा हा सरस मराठी अनुवाद… पुत्र चेटकिणीचा