Anandayatri Dudhwala (आणन्दयात्री दूधवाला)
१९४९ मध्ये केरळचे वर्गिस कुरियन, हे अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेऊन गुजरातमध्ये स्थायिक झाले. आणि दुधाला स्पर्श न करणाऱ्या या अवलियाने तिथे दुग्धक्रांती घडवून आणली. त्या क्रांतीने वर्गिस कुरियन यांना 'भारताचा दुधवाला' ही उपाधी प्राप्त झाली. वर्गिस कुरियन यांनी आपले संपूर्ण आयुष्य गुजरातमध्ये घालवले. तिथल्या अशिक्षित शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांनी साऱ्या जगाला अक्षरशः दुध पाजले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांच्या अथक प्रयत्नांतून दुग्ध्याव्यावासायातील, 'बिलियन लिटर आयडिया' हा दुधाचा पूर आणणारा प्रकल्प ठरला. म्हणून त्यांना त्यांच्या या असामान्य कार्यासाठी विविध राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील मानसन्मान प्राप्त झाले. आज त्यांच्या हयातीनंतरही लोकांच्या हृदयात अमूल चा ब्र्यांड कायमचा कोरला गेला आहे. विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो यांनी असामान्य अशा वर्गिस कुरियन यांचा ललित शैलीने घेतलेला जीवनालेख तरुणांना नक्कीच स्फूर्तिदायक ठरेल !