Vedh Pavsacha Arthat Goshta Mansoonchi (वेध पावसाच
उकाड्यापासून सुटका, पाण्याच्या दुर्भिक्षापासून मुक्ती इत्यादींमुळे मान्सूनच्या पावसाचं स्वागत सुखकारकच. दरवर्षी दक्षिण आशिया विशेषतः भारत देश या पावसानं न्हाऊन निघतो. हिंदी महासागरापासून वाहणाऱ्या मोसमी वार्यांची परिणीती म्हणजे भारतामधील पावसाळा. त्यालाच आपण मान्सून म्हणतो. खरं तर मान्सून हि एक मोठी गुंतागुंतीची आणि अद्यापही संपूर्णपणे न उलगडलेली हवामान प्रणाली आहे.