-
Atisukshma Mahaprachand-Nano Technology ( अतिसूक्ष
1993-94 सालापर्यंत आपल्याला हे माहितीदेखील नव्हते की, माहिती तंत्रज्ञान आपले संपूर्ण जीवन ढवळून काढणार आहे. तसेच आपल्याला म्हणता येईल की, नजिकच्या 2/4 वर्षातच नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आपले संपूर्ण व्यक्तिगत व समाजजीवन बदलत जाणार आहे.
-
Nakashachya Reshanvarun Chalatana (नकाशाच्या रेषा
नकाशे पाहायला आपल्याला आवडत नाहीत. पण ज्यांना ते आवडतात असे शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि जातिवंत प्रवासी हे मात्र अगत्याने नकाशांचा उपयोग करतात आणि त्यापासून अनोखा आनंद मिळवतात. हे नकाशाचं तंत्र असतं तरी कसं? त्याचे किती प्रकार मंडळींच्या आयुष्यात कोणत्या गंभीर आणि गंमतीदार घटना घडल्या आहेत? हे सगळं समजुन घेतलं टार वेगळी दृष्टी मिळेल आणि प्रवासाचा आनंद अधिक सुखद होइल...
-
Suryamala Aani Adbhut Vishwa (सूर्यमाला आणि अद्भुत
अंतरिक्षातील अद्भूत जगाची सफर, सहजरीत्या...
-
Amerikechi CIA (अमेरिकेची सी.आय.ए)
भारतात एखादा दहशतवादी हल्ला झाला की त्याचे खापर भारतीय गुप्तचर संस्थांवर फोडले जाते. यावरूनच देशाच्या गुप्तचर संघटनांचे महत्त्व अधोरेखित होते. येथे काम करणाऱ्या व्यक्तींवर या संस्थेचे अस्तित्व अवलंबून असते. अमेरिकेच्या सी.आय.ए. या गुप्तहेर संघटनेचे मोठे वर्चस्व आहे. जगावर आपला दबदबा प्रस्थापित करणाऱ्या अमेरिकेच्या मागे सी.आय.ए. ही त्यांची गुप्तचर संस्था असल्याचे मानले जाते. जगभरात आपल्या हेरगिरीचे जाळे पसरविलेल्या या गुप्तचर संस्थेची माहिती, तिची कार्यपद्धती याचा आढावा पंकज कालुवाला यांनी ‘अमेरिकेची सी.आय.ए.’ या पुस्तकात घेतला आहे. ही संस्था सुरू होण्यामागची करणे, स्थापना आणि तिचा विकास व या संस्थेत काम करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेल्या कार्याविषयीचा आढावा लेखकाने घेतला आहे. या संस्थेने भारतात केलेल्या गुप्त कारवाया, विविध देशांमध्ये केलेल्या कारवाया, या संस्थेत असलेल्या स्त्रियांच्या कार्याचा आढावाही लेखकाने घेतला आहे. हे पुस्तक वाचताना माणसाच्या बुद्धिमत्तेने, त्याच्या कार्यशक्तीने अचंबित व्हायला होते. या संस्थेविषयी वाचताना जागतिक राजकारण व त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी उलगडत जातात.
-
Vidnyanala Na Ulagadaleli Rahsye (विज्ञानाला न उलग
आपल्या सभोवताली अशी अनेक घटिते आहेत ज्याचा विज्ञानाला अजूनही उलगडा झालेला नाही. त्याचा वेध.
-
Vismaykarak Sajiv Srusti (विस्मयकारक सजीव सृष्टी)
सजीव सृष्टीतील चमत्कारिक पशु, पक्षी व त्यांची वैशिष्ठ्यपूर्ण जीवनशैली यांची रसाळ ओळख.
-
Israelchi Mosad (इस्रायलची मोसाद)
निरनिराळ्या गुप्तचर संघटनांचा विषय निघाला की, आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेची सी.आय.ए., पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत रशियाची के.जी.बी. , ब्रिटिशांची एम.आय. 6 यांसारख्या गुप्तचर संस्थांची नावे तरळून जातात. आपण भारतीय असल्याने पाकिस्तानच्या आय.एस.आय. चे नावही डोळ्यांसमोर येते. हे सगळं खरं असलं तरी आपल्या नजरेत ठसठशीतपणे भरते “ इस्रायलची मोसाद” हे नाव. मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे तिचे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरून उरणार्या.. आजूबाजूला असलेली अरब शत्रू राष्ट्र, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शहकाटशह यातून मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला अक्षरश: तारलं आहे. तिच्याच कारवायांचा थोडक्यात मागोवा घ्यायचा हा प्रयत्न.
-
Soviet Rashiachi KGB ( सोव्हिएत रशियाची केजीबी)
सोव्हिएत संघाचं अस्तित्व आता राहिलं नसलं तरी कधी काळी साम्यवादाचा जयजयकार करणार्याय आणि मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पाठराखण करण्याची भूमिका घेणार्याे रशियाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. पण आंतरराष्ट्रीय राजकारण अन गुप्तहेर संस्थांचे क्रियाकलाप यांच्यात अशा हळवेपणाला काही अर्थ नसतो. जे आपल्याला दिसतं किंवा दाखवलं जातं त्यापेक्षा ते जग वेगळाच असतं. सोव्हिएत गुप्तचर संस्था केजीबीची माहिती घेताना त्याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येतो. हाच अनुभव मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
-
Prakash-Bije (प्रकाश-बीजे)
महाराष्ट्रातील, देशातील तसेच परदेशातील सामान्य म्हटल्या जाणाऱ्या माणसांनी केलेली असामान्य कामे, निर्मिलेल्या संस्था आणि पेरलेली प्रकाशबीजे
-
Shodh Sagaracha (शोध सागराचा)
समुद्राचे विज्ञान असंख्य पैलूंनी विकसित होत आहे. त्याचा हा मनोज्ञ वेध
-
Gauravgatha Istro Chi (गौरवगाथा इस्र्तो ची)
आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी अंतराळ विज्ञान क्षेत्रात 'इस्त्रोंनी' केली. त्या संस्थेची ही गौरवगाथा
-
Ayabaya (आयाबाया)
आपल्या कल्पनेपलीकडील सामाजिक मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वांनी स्वत:चे व एकूण स्त्री वर्गाचे स्थान बळकट केले. या पुस्तकातील स्त्रिया या खऱ्या वीरयोद्धा आहेत.
-
Hema Tobiyam Ji ('हेमा टोबियम जी')
डॉ. गाडगीळांनी त्यांच्या गुहागर जवळच्या गिमवी गावातील एका असाध्य रोगावर संशोधन करून लास शोधून काढली. डॉ. गाडगीळांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या दीर्घ आयुष्य प्रवासाची सांगितलेली सध्या व रसाळ भाषेतील ही सरस आत्मकथा, जेष्ठांना भूह्ताकालात नेणारी व तरुणांना मार्गदर्शक ठरणारी...