Israelchi Mosad (इस्रायलची मोसाद)

By (author) Pankaj Kaluvala Publisher Param Mitra Prakashan

निरनिराळ्या गुप्तचर संघटनांचा विषय निघाला की, आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेची सी.आय.ए., पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत रशियाची के.जी.बी. , ब्रिटिशांची एम.आय. 6 यांसारख्या गुप्तचर संस्थांची नावे तरळून जातात. आपण भारतीय असल्याने पाकिस्तानच्या आय.एस.आय. चे नावही डोळ्यांसमोर येते. हे सगळं खरं असलं तरी आपल्या नजरेत ठसठशीतपणे भरते “ इस्रायलची मोसाद” हे नाव. मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे तिचे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरून उरणार्या.. आजूबाजूला असलेली अरब शत्रू राष्ट्र, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शहकाटशह यातून मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला अक्षरश: तारलं आहे. तिच्याच कारवायांचा थोडक्यात मागोवा घ्यायचा हा प्रयत्न.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category