Soviet Rashiachi KGB ( सोव्हिएत रशियाची केजीबी)
सोव्हिएत संघाचं अस्तित्व आता राहिलं नसलं तरी कधी काळी साम्यवादाचा जयजयकार करणार्याय आणि मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पाठराखण करण्याची भूमिका घेणार्याे रशियाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. पण आंतरराष्ट्रीय राजकारण अन गुप्तहेर संस्थांचे क्रियाकलाप यांच्यात अशा हळवेपणाला काही अर्थ नसतो. जे आपल्याला दिसतं किंवा दाखवलं जातं त्यापेक्षा ते जग वेगळाच असतं. सोव्हिएत गुप्तचर संस्था केजीबीची माहिती घेताना त्याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येतो. हाच अनुभव मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे.