-
Satiche Vaan (सतीचे वाण)
सतीचे वाण' म्हणजे गोवामुक्तिसंग्रामाच्या गौरवशाली स्मृति आहेत. त्या अनुभवल्या आहेत संग्रामात सक्रीय भाग घेतल्याच्या 'गुन्ह्या' दाखल २६ वर्षे कारावासाची शिक्षा झालेल्या मोहन रानडे यांनी. मुक्तिसंग्राम, गोवा व पोर्तुगाल येथे भोगावा लागलेला १९५५ ते १९६९ पर्यंतचा तुरुंगवास, आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीतील स्वातंत्र्यलढा, पोर्तुगालमधील हुकुमशाहीविरुद्धचा दीर्घ संघर्ष याच्याशी संबंधित या स्मृति आहेत. गोवा मुक्तिसंग्राम गोव्यापुरता कधीच सीमित नव्हता. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील ती अखेरची लढाई होती, तर पोर्तुगीज साम्राज्यवादविरोधी युध्दातील ती पहिली रणभेरी होती. गोवामुक्ति भारतीय स्वातंत्र्याची पूर्णता होती, तर आफ्रिकेतील पोर्तुगीज साम्राज्याची तसेच पोर्तुगालमधील हुकुमशाहीची ती मृत्युघंटा होती. अन्यायाविरुद्ध संतापाने उठलेली सामान्य जनता कशी असामान्यपणे लढते, इतिहासाचा ओघ कसा बदलू शकते याचे साक्षात दर्शन पुन: एकदा 'सतीचे वाण' घडविते.
-
Jamat E Purogami (जमात ए पुरोगामी)
पत्रकार वा साहित्यिक यांना पुरोगामी प्रतिगामी असायची कुठलीही गरज असते. समाजाचे प्रबोधन हे अशा वर्गाचे खरे कर्तव्य असते. जेव्हा असा वर्ग विचारधारेचा गुलाम होतो आणि खोटीनाटी प्रमाणपत्र पुरवून जनतेची दिशाभूल करण्यास हातभार लावण्यात पुढाकार घेतो,तेव्हा त्याचेही दिवाळे वाजू लागते. आज वर्तमानपत्रे,वाहिन्या किंवा साहित्य क्षेत्राची त्यामुळेच धूळधाण उडालेली आहे.नावाजलेले संपादक वा माध्यमे दिवाळखोरीत गेली आहेत. हमीद दलवाईंच्या पुरोगामी विचार वा भूमिकांना हेच लोक पायदळी तुडवत असतील , तर त्यांचे पुरोगामी मुखवटे फाडण्याची गरज आहे आणि त्या मुखवट्याआड लपलेल्या पुरोगामी जमातीचा खरा चेहरा सामान्य माणसाला दाखवणे अगत्याने आहे. एकवेळ जिहादी कसाब किंवा तालिबानी ओसामा परवडला. कारण तो समोरून येणारा उघड शत्रू असतो. पण जमते पुरोगामी हा गाफील ठेऊन मिञरूपाने येणार मायावी राक्षस असतो. त्याच्याविषयी जनतेला सातत्याने सावध करणे व त्याच्या मायावी रुपमागचा हिडीस चेहरा लोकांना उग्गोचर करून दाखवणे, हे खरेखुरे पुरोगामी व प्रगतिशील कार्य आहे.