Satiche Vaan (सतीचे वाण)
सतीचे वाण' म्हणजे गोवामुक्तिसंग्रामाच्या गौरवशाली स्मृति आहेत. त्या अनुभवल्या आहेत संग्रामात सक्रीय भाग घेतल्याच्या 'गुन्ह्या' दाखल २६ वर्षे कारावासाची शिक्षा झालेल्या मोहन रानडे यांनी. मुक्तिसंग्राम, गोवा व पोर्तुगाल येथे भोगावा लागलेला १९५५ ते १९६९ पर्यंतचा तुरुंगवास, आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीतील स्वातंत्र्यलढा, पोर्तुगालमधील हुकुमशाहीविरुद्धचा दीर्घ संघर्ष याच्याशी संबंधित या स्मृति आहेत. गोवा मुक्तिसंग्राम गोव्यापुरता कधीच सीमित नव्हता. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील ती अखेरची लढाई होती, तर पोर्तुगीज साम्राज्यवादविरोधी युध्दातील ती पहिली रणभेरी होती. गोवामुक्ति भारतीय स्वातंत्र्याची पूर्णता होती, तर आफ्रिकेतील पोर्तुगीज साम्राज्याची तसेच पोर्तुगालमधील हुकुमशाहीची ती मृत्युघंटा होती. अन्यायाविरुद्ध संतापाने उठलेली सामान्य जनता कशी असामान्यपणे लढते, इतिहासाचा ओघ कसा बदलू शकते याचे साक्षात दर्शन पुन: एकदा 'सतीचे वाण' घडविते.