Phiruni Navi Janmale Mi (फिरुनी नवी जन्मले मी)
अरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे याच जन्मी झालेल्या पुनर्जन्माची ती चित्तरकथा आहे ! हलाखीत असलेल्या कुटुंबातील ही पितृहीन युवती औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबलच्या जागेसाठी मुलाखतीला म्हणून रेल्वेनं लखनौहून दिल्लीला जायला निघते. खचाखच भरलेल्या अनारक्षित डब्यात ऐन मध्यरात्री गळ्यातल्या सोन्याची चेन हिसकावणाऱ्या गुंडांशी झटापट होऊन ती बाहेर अंधारात फेकली जाते. तिच्या दुर्दैवानं त्याच वेळी उलट दिशेनं येणाऱ्या गाडीखाली येऊन ती आपला पाय गमावते. यातून ती कशीबशी बचावते. त्याही हतबल, अपंग स्थितीत आपल्या कृत्रिम पायानिशी हिमालयचं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न मनात बाळगते, आणि नंतर अवघ्या दोन वर्षात ते खरोखरच गाठून तिथवर पोचणारी जगातली पहिली अपंग स्त्री म्हणून ख्यात होती. 'पडेन पण पडून राहणार नाही ' हे त्यातलं निश्चयी अध्यात्म सर्वांना धडा आणि प्रेरणा म्हणून मोलाचे आहे.