-
Peshave (पेशवे)
पेश करतो तो पेशवा…..पेशवा म्हणजे छ्त्रपतींचा सरकारकून…छत्रपतींनी पेशवेपदाचे रुपांतर ’मुख्यदिवाण’, ’नेता’,’पंतप्रधान’ या बिरुदावलीत केले…
-
Phiruni Navi Janmale Mi (फिरुनी नवी जन्मले मी)
अरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे याच जन्मी झालेल्या पुनर्जन्माची ती चित्तरकथा आहे ! हलाखीत असलेल्या कुटुंबातील ही पितृहीन युवती औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबलच्या जागेसाठी मुलाखतीला म्हणून रेल्वेनं लखनौहून दिल्लीला जायला निघते. खचाखच भरलेल्या अनारक्षित डब्यात ऐन मध्यरात्री गळ्यातल्या सोन्याची चेन हिसकावणाऱ्या गुंडांशी झटापट होऊन ती बाहेर अंधारात फेकली जाते. तिच्या दुर्दैवानं त्याच वेळी उलट दिशेनं येणाऱ्या गाडीखाली येऊन ती आपला पाय गमावते. यातून ती कशीबशी बचावते. त्याही हतबल, अपंग स्थितीत आपल्या कृत्रिम पायानिशी हिमालयचं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न मनात बाळगते, आणि नंतर अवघ्या दोन वर्षात ते खरोखरच गाठून तिथवर पोचणारी जगातली पहिली अपंग स्त्री म्हणून ख्यात होती. 'पडेन पण पडून राहणार नाही ' हे त्यातलं निश्चयी अध्यात्म सर्वांना धडा आणि प्रेरणा म्हणून मोलाचे आहे.
-
Shreekrushan Sathalyatra (श्रीकृष्ण स्थलयात्रा)
गीता आदिनाथ हरवंदे यांनी यापूर्वी देशातील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. आता श्रीकृष्णाचे जिथे जिथे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणी दौरा करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. श्रीकृष्णाचा पदस्पर्श झालेली ठिकाणे 9 राज्यांत विखुरलेली आहेत. आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, केरळ, दिल्ली, बिहार या राज्यांतील विविध ठिकाणे आणि तेथील आताची स्थिती याबद्दल हरवंदे यांनी विस्ताराने लिहिले आहे. श्रीकृष्णाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ठिकाणाची माहिती ही कल्पनाच विलक्षण आहे. हरवंदे यांनी मथुरेपासून सुरवात करून इंद्रप्रस्थपर्यंतची सर्व माहिती आजच्या संदर्भासह देताना या स्थळाबद्दल असलेल्या आख्यायिका आणि दंतकथा याचीही थोडक्यात माहिती दिली आहे. भक्ती व यात्रा या दृष्टीनेच हे पुस्तक महत्त्वाचे आहे असे नाही तर ज्यांना इतिहास आणि भूगोल जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठीही हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
-
Trikalsandhya ( त्रिकालसंध्या)
ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक. त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास यात आहे. पत्रकारितेतील अनुभव, त्याचबरोबर अनंतराव भालेराव, बाबा दळवी यांच्याकडून कसं शिकायला मिळालं, ते लिहितानाच या दोघांचंही व्यक्तिचित्र नेमकेपणानं मांडलं आहे. पत्रकारितेत आलेले अनुभव सांगताना न्यायालयीन खटले, विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांचं वागणं, याबाबत विस्तारानं लिहिलं आहे.