Colar Tatha,Bayaka Satha (कॉलर ताठ,बायका साठ)
विश्वास साळुंखे हे एक नाट्यकलावंत, शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी विपुल नाट्यलेखनही केलेले अहे. अभिनयाची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रासह देशभर मराठी व हिंदी नाटकाचे सादरीकरण केले. त्याच्या लेखन आणि अभिनयातील विनोदी बाज वैशिष्ट्यपूर्ण होता. विविध लोककला महोत्सवामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. लोककलाक्षेत्रामध्ये त्याचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेक नवोदित कलावंत घडविले. त्याच्या या अलौकिक कार्यास शासनाने आणि विविध नामाकिंत संस्थांनी सन्मानाने गौरविलेले आहे. लेखक, अस्सल कलावंत, हाडाचे शिक्षक आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे विश्वास साळुंखे कायम स्मरणात राहतात.