Kaushalye Vel Vyasthapanachi (कौशल्य वेळ व्यवस्थाप
वेळ व्यवस्थापन हा शब्दप्रयोग थोडासा गफलत करणारा आहे . आपण वेळ निर्माण किवा नष्ट करू शकत नाही ,थांबवू किवा साठवू शकत नाही . अशा वेळी वेळ व्यवस्थापन म्हणजे वेळेचं व्यवस्थापन नव्हे, तर व्यवस्थापन करावं लागतं ते आपल्या स्व :चं ,हे प्रथम लक्षात घ्यावं लागतं . वेळ व्यवस्थापनाचे खरे कौशल्य आणि आव्हान आहे ते आपल्याजवळील उपलब्ध वेळेच्या अनुषंगाने आपणास दैनंदिन जीवनात पार पाडाव्या लागणाऱ्या वैयक्तिक ,व्यावसायिक , कौटुबिक आणि सामाजिक जबाबदायांचे सूत्रबध्द नियोजन व प्रयत्नपूर्वक अंमलबजावणी करण्यात , नियमितपणा आणि सातत्य राखण्यात ,त्याचबरोबर वेळेचा अपव्यय करणाऱ्या आपल्या काही सवयी व स्वभावदोषांवर मात करण्याची कौशल्य प्रयत्नपूर्वक आत्मसात करण्यात !