Glanirbhavati Bharat (ग्लानिर्भवति भारत)
अनुकरणीय लेखनशैली नसूनही अरुण साधू यांची विषयाची निवड आणि रोख-ठोक मांडणी यामुळे त्यांच्या कथा व कादंबऱ्यांचा वेगळाच बाज असतो. भाषेतून नव्हे तर मांडणीमधूनच कथाविषयासंबंधीची त्यांची अतूट बांधिलकी तीव्रतेने व्यक्त होते. ‘बिनपावसाचा दिवस’, ‘माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘मुक्ती’, ‘मंत्रजागर’ आणि ‘बेचका’ या कथासंग्रहानंतर साधू यांचा हा संग्रह आहे वेगळ्याच विषयावर वेगळ्या धाटणीची मांडणी घेऊन. सर्व कथांमधून एक सूत्र आहे, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या विषयाचे. देशाची, समाजाच्या नीति-मूल्यांची, संस्कृतीची होत असलेली सर्वांगीण अधोगती. आजच्या सामाजिक वास्तवाचे दाहक चित्रण असलेल्या या कथा विचार करायला लावणार्या आहेत तशा अस्वस्थ करणार्याही.