-
Glanirbhavati Bharat (ग्लानिर्भवति भारत)
अनुकरणीय लेखनशैली नसूनही अरुण साधू यांची विषयाची निवड आणि रोख-ठोक मांडणी यामुळे त्यांच्या कथा व कादंबऱ्यांचा वेगळाच बाज असतो. भाषेतून नव्हे तर मांडणीमधूनच कथाविषयासंबंधीची त्यांची अतूट बांधिलकी तीव्रतेने व्यक्त होते. ‘बिनपावसाचा दिवस’, ‘माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘मुक्ती’, ‘मंत्रजागर’ आणि ‘बेचका’ या कथासंग्रहानंतर साधू यांचा हा संग्रह आहे वेगळ्याच विषयावर वेगळ्या धाटणीची मांडणी घेऊन. सर्व कथांमधून एक सूत्र आहे, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या विषयाचे. देशाची, समाजाच्या नीति-मूल्यांची, संस्कृतीची होत असलेली सर्वांगीण अधोगती. आजच्या सामाजिक वास्तवाचे दाहक चित्रण असलेल्या या कथा विचार करायला लावणार्या आहेत तशा अस्वस्थ करणार्याही.
-
Mantrajagar (मंत्रजागर)
वेगळ्या आणि अद्भुत वाटा चोखाळणार्या अरुण साधू यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कथा. पण वेगळ्या तरी कसे म्हणता येईल ? कारण मानवी संस्कृतीला लागलेली विकृतीची कीड, आण्विक प्रलय, मराठी भाषेची दुर्दशा हे विषय साधूंनी यापूर्वीही आपल्या कथा-कादंबर्यामधे हाताळले आहेत. किंबहुना या विषयांनी लेखकाला झपाटले आहे. व्यापक सामाजिक व मानवी आशय असलेल्या व भविष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणार्या या अद्भुत विज्ञानकथा अथवा फॅन्टसीज् आहेत असे म्हणता येईल. साधू यांच्या खास सहज शैलीतील.
-
Sahakardhurin (सहकारधुरीण)
भारतातील साखर उद्योगात सहकाराची ध्वजा रोवण्याचं पायाभूत कार्य कार्य करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचं समग्र चरित्र. विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिद्ध केलेला 'सहकारधुरीण' हा समग्र चरित्रग्रंथ.
-
Mumbai Dinak (मुंबई दिनांक)
सामाजिक जीवनातील, प्रत्यक्षा-प्रत्यक्ष राजकारणातील जे अंतःस्त्रोत आहेत. हे अंतःस्त्रोत ज्या चिवटपणे परस्परांच्या जगण्याला छेदून-भेदून जातात, त्याचे प्रत्ययकारी शैलीत दर्शन घडविणारी आणि विस्मयचकित करणारी राजकीय कादंबरी.