Pahave Apanasi Apan (पाहावे आपणासी आपण)
अध्यात्म काय किंवा तत्त्वज्ञान काय, शेवटी जीवनातूनच उदयाला येत असतं, याचा बोध करून देणारा हा लेखसंग्रह आहे. जन्म-मृत्यूच्या अवकाशात नाना प्रकारचे अनुभव घेता घेता माणूस जगण्याचा अर्थ शोधत राहतो आणि आपापल्या मर्यादेत त्या अर्थवत्तेने जगणं सुफळ करण्याचा प्रयत्न करत राहतो. या प्रयत्नांत त्याला जे गवसतं त्यांचीच वेचक मांडणी प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘पाहावे आपणासी आपण’ या पुस्तकातील लेखांमधून केली आहे.